सहप्रवाशाच्या मृत्यूनंतर ‘त्यांनी’ही सोडला प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 12:44 AM2019-07-19T00:44:06+5:302019-07-19T00:45:12+5:30

मुंबई-हावडा मेलने एकमेकांशी अनोळखी असलेले दोन प्रवासी हावडाकडे प्रवास करीत होते. रेल्वेच्या एकाच कोचमध्ये ते बसले होते. त्यांची आपसात बातचीतही झाली नाही. त्यातील एकाचा अचानक मृत्यू झाला. दुसऱ्या प्रवाशाला त्यांच्या मृत्यूची माहिती मिळाली. त्यांचीही प्रकृती बिघडली आणि त्यांनीही प्राण सोडला. एकाच प्रवासातील दोघांचा असा मृत्यू झाल्याच्या घटनेने या कोचमधील प्रवाशांनीही हळहळ व्यक्त केली.

After the death of copassanger ,they also leave life | सहप्रवाशाच्या मृत्यूनंतर ‘त्यांनी’ही सोडला प्राण

सहप्रवाशाच्या मृत्यूनंतर ‘त्यांनी’ही सोडला प्राण

googlenewsNext
ठळक मुद्देमुंबई-हावडा मेलमधील घटना

लोकमत  न्यूज  नेटवर्क 
नागपूर : मुंबई-हावडा मेलने एकमेकांशी अनोळखी असलेले दोन प्रवासी हावडाकडे प्रवास करीत होते. रेल्वेच्या एकाच कोचमध्ये ते बसले होते. त्यांची आपसात बातचीतही झाली नाही. त्यातील एकाचा अचानक मृत्यू झाला. दुसऱ्या प्रवाशाला त्यांच्या मृत्यूची माहिती मिळाली. त्यांचीही प्रकृती बिघडली आणि त्यांनीही प्राण सोडला. एकाच प्रवासातील दोघांचा असा मृत्यू झाल्याच्या घटनेने या कोचमधील प्रवाशांनीही हळहळ व्यक्त केली.
चिन्मय दास (७३) असे एका मृत झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. दास यांना कॅन्सर होता. मुंबईत उपचार घेतल्यानंतर ते पत्नी आणि जावयासह हावडाला जात होते. दुसरा मृत ४० वर्षे वयोगटातील आहे. दोघेही १२८०९ मुंबई-हावडा मेलच्या एस ३ कोचने प्रवास करीत होते. कोचमधील प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार अनोळखी मृत आजारी होता. सकाळी तो शौचालयाच्या दिशेने गेला. त्याला उलटी झाली आणि शौचालयाच्या गेटसमोरच तो पडला. इतर प्रवाशांनी त्याला उठविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही. याची माहिती रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला देण्यात आली. नियंत्रण कक्षाने लोहमार्ग पोलिसांना सूचना दिली. इकडे प्रवाशाचा अचानक मृत्यू झाल्याची माहिती दास यांच्या कानावर पडली. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली. गाडी नागपूर रेल्वेस्थानकावर पोहोचण्यापूर्वीच लोहमार्ग पोलीस, आरपीएफ जवान प्लॅटफॉर्मवर पोहोचले. पंचनामा करीत असताना दास यांची प्रकृती आणखीनच ढासळली. मृत प्रवाशाला गाडीखाली उतरविण्यात आले. दास यांनाही खाली उतरविण्यात आले. त्यांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तपास हवालदार संजय पटले करीत आहेत.

Web Title: After the death of copassanger ,they also leave life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.