Maharashtra Election 2019; रामटेकमध्ये अ‍ॅड. आशिष जयस्वाल लढवणार अपक्ष निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 02:41 PM2019-10-03T14:41:00+5:302019-10-03T14:41:28+5:30

आपला भाजप-सेना नेतृत्वावर कुठलाच राग नसल्याचे स्पष्ट करून अ‍ॅड. आशिष जयस्वाल यांनी रामटेक मतदारसंघातून आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.

Ad Ashish Jaiswal contest elections independent in Ramtek | Maharashtra Election 2019; रामटेकमध्ये अ‍ॅड. आशिष जयस्वाल लढवणार अपक्ष निवडणूक

Maharashtra Election 2019; रामटेकमध्ये अ‍ॅड. आशिष जयस्वाल लढवणार अपक्ष निवडणूक

googlenewsNext
ठळक मुद्देभाजप-शिवसेना नेतृत्वावर कुठलाच राग नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: आपला भाजप-सेना नेतृत्वावर कुठलाच राग नसल्याचे स्पष्ट करून अ‍ॅड. आशिष जयस्वाल यांनी रामटेक मतदारसंघातून आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. सोशल मिडियावर टाकलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी, मला उमेदवारी न मिळाल्याने मी अजिबात नाराज नाही. पक्षश्रेष्ठींना त्यांच्या राजकीय अडचणी असू शकतात. मीच उमेदवार राहिलो पाहिजे, अशी माझी भावना नाही. मी युतीच्या नेत्यांचा नेहमीच आदर करत आलो आहे. ५ वर्ष माझ्या कार्यकत्यांसोबत द्वेषाने व सूड भावनेने वागणाऱ्या उमेदवाराचा मी प्रचार करू शकणार नाही, त्यामुळे उद्या शुक्रवारी मी अपक्ष निवडणुकीचा अर्ज सादर करणार आहे, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Web Title: Ad Ashish Jaiswal contest elections independent in Ramtek

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.