जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढविल्यास कारवाई  : पालकमंत्री राऊत यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 09:18 PM2020-03-28T21:18:28+5:302020-03-28T21:19:23+5:30

जनतेला रास्त दरात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टीने संबंधित व्यापारी-दुकानदारांना तात्काळ सूचना द्याव्या तसेच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवल्यास संबंधितांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश आज शनिवारी पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले.

Action to raise rates of essential commodities: A directive by Guardian Minister Raut | जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढविल्यास कारवाई  : पालकमंत्री राऊत यांचे निर्देश

जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढविल्यास कारवाई  : पालकमंत्री राऊत यांचे निर्देश

Next
ठळक मुद्देपोलीस बंदोबस्त कडक करा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संचारबंदी, लॉकडाऊनच्या काळात नागपुरात जीवनावश्यक वस्तू व सेवा सुरळीतपणे सुरू आहेत. मात्र, या कठीण काळात कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंचे जसे किराणा, धान्य, भाजीपाला यांची भाववाढ होऊ नये, जनतेला रास्त दरात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टीने संबंधित व्यापारी-दुकानदारांना तात्काळ सूचना द्याव्या तसेच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवल्यास संबंधितांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश आज शनिवारी पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले.
पालकमंत्र्यांनी शनिवारी मुख्यमंत्र्यांना नागपूर जिल्ह्यातील सद्यस्थितीबाबत माहिती दिली. यापूर्वी त्यांनी जिल्हा प्रशासन जसे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, मेयो व मेडिकल रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्याकडून सद्यस्थितीचा आढावा घेतला. हातावर आणून पानावर खाणाऱ्या गोरगरीब, निराधार, झोपडपट्टीतील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले आहेत.
कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्हा प्रशासनाचे युद्धस्तरीय काम सुरू आहे. नागपुरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता अकरापर्यंत वाढली आहे. या पार्श्वभूमीवर येणारे दहा दिवस अतिशय महत्त्वाचे, कठीण आणि निर्णायक राहणार आहेत. त्यामुळे जनतेने अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी घरीच राहावे, शांतता बाळगावी, संयम ठेवावा, अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. सामाजिक अंतराचे (सोशल डिस्टनस) पालन करावे, असे पालकमंत्र्यांनी कळकळीचे आवाहन केले आहे.
नागपुरातील बहुतांश जनता, प्रशासनाच्या सूचनांचे नियमित पालन आणि सहकार्य करीत आहे. ते निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत. मात्र, काही लोक अद्यापही प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून ‘मला काही होत नाही’ या आविर्भावात विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, पोलीस विभागाने अधिक कडक बंदोबस्त करावा अशा सूचनाही शनिवारी पालकमंत्री राऊत यांनी पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक (नागपूर ग्रामीण) यांना दिल्या आहेत. नागपूरच्या जनतेने अशा या कठीण परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य करावे, घरीच राहावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.

Web Title: Action to raise rates of essential commodities: A directive by Guardian Minister Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.