वीजबिल वसुली न वाढल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 10:14 PM2019-08-13T22:14:13+5:302019-08-13T22:15:06+5:30

वसुली कार्यक्षमता न वाढल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागेल, असा इशाराच महावितरणचे प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी दिला आहे.

Action against officers if electricity bill recovery is not increased | वीजबिल वसुली न वाढल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

वीजबिल वसुली न वाढल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देमहावितरणच्या प्रादेशिक संचालकांचे निर्देश : नागपूर परिक्षेत्राचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वीजबिल वसुलीची कार्यक्षमता वाढविण्याची आवश्यकता आहे. यासाठी नियमित चिंतन व्हायला हवे. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्राहकांच्या नियमितपणे भेटी घ्याव्या. जर वसुली कार्यक्षमता न वाढल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागेल, असा इशाराच महावितरणचे प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी दिला आहे. नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, अकोला आणि अमरावती या पाचही परिमंडलातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा त्यांनी मंगळवारी संयुक्त आढावा घेतला.
सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी वास्तव्यास राहण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. या बैठकीत ग्राहकांकडील वीजबिलांची वसुली कार्यक्षमता, थकबाकी, वीजहानी, विविध उपाययोजनांतून वाढलेली वीजविक्री आदी विषयांचा विस्तृत आढावा घेण्यात आला. या बैठकीला मुख्य अभियंते सुहास रंगारी, सुखदेव शेरकर, सुचित्रा गुजर, अनिल डोये, हरीश गजबे, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार, उपमहाव्यवस्थापक (मानव संसाधन) वैभव थोरात, उपमहाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) प्रमोद खुळे यांच्यासह पाचही परिमंडलातील सर्व अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, वित्त व लेखा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महावितरणविरोधातील लोकपाल यांच्याकडील तक्रारींवर अभ्यासपूर्ण युक्तिवाद करणाऱ्या हिंगणघाट विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत पावडे यांचा दिलीप घुगल यांच्या हस्ते यावेळी सत्कारही करण्यात आला.

Web Title: Action against officers if electricity bill recovery is not increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.