ऑटो चोरणाऱ्या आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:14 AM2021-02-23T04:14:31+5:302021-02-23T04:14:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सीताबर्डी येथील झाशी राणी चौकातून एक ऑटो चोरणाऱ्या आरोपीला बुटीबोरी पोलिसांनी अटक केली ...

Accused of stealing auto arrested | ऑटो चोरणाऱ्या आरोपीला अटक

ऑटो चोरणाऱ्या आरोपीला अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सीताबर्डी येथील झाशी राणी चौकातून एक ऑटो चोरणाऱ्या आरोपीला बुटीबोरी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी देवळी, गुजरवाडी येथील रहिवासी सुकेश ऊर्फ सुक्या सिद्धार्थ ढेंगरे (३४) हा आहे. आरोपीने १७ फेब्रुवारीला दुपारी २ च्या सुमारास झाशी राणी चौकातून शालिमार बार समोरून ऑटो क्र. एमएच ४९/ एआर/ ३६८४ चोरला होता. ऑटो मालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. पोलिसांना चोरीचा ऑटो बुटीबोरी येथे असल्याची माहिती मिळाली होती. त्यानतंर आरोपीला अटक करून ऑटो ताब्यात घेण्यात आला.

....

देशी दारू पकडली

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहर पोलीस परिमंडळ-५ च्या पथकाने कोराडी व यशोधरानगर येथे अवैध दारू पकडली. सोमवारी सकाळी १०.३० च्या सुमारास पोलीस पथकाला कोराडी महादुला येथील सिद्धार्थनगर येथील रंगारी याच्या अड्ड्यावर दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार धाड घालून दारूच्या ३८ बॉटल जप्त केल्या. आरोपी प्रवीण रंगारी याच्याविरोधात कोराडी पोलिसात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई)अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरी कारवाई यशोधरानगर येथे केली. सकाळी १० च्या सुमारास पायदानावर गोणी ठेवून एक संशयित तरुण जाताना दिसला. त्याला थांबवून चौकशी केली असता त्याच्याकडून सात हजाराची देशी दारू जप्त करण्यात आली. आरोपी बिनाकी मंगळवारी येथील रोशन सुरेश गायकवाड (२८) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

Web Title: Accused of stealing auto arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.