नागपुरात  कोरोना विषाणूचे ९४ संशयित रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 09:29 PM2020-03-23T21:29:15+5:302020-03-23T21:31:30+5:30

कोरोना विषाणूबाधितांची संख्या गेल्या दोन आठवड्यापासून स्थिर असली तरी संशयित रुग्णांची संख्या वाढत आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे चार पॉझिटिव्ह सोडल्यास इतर सर्व नमुने निगेटिव्ह आले आहेत.

94 suspected coronary disease patients in Nagpur | नागपुरात  कोरोना विषाणूचे ९४ संशयित रुग्ण

नागपुरात  कोरोना विषाणूचे ९४ संशयित रुग्ण

Next
ठळक मुद्दे१७ नमुने निगेटिव्ह : मेयो, मेडिकलमध्ये १९ रुग्ण दाखल

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूबाधितांची संख्या गेल्या दोन आठवड्यापासून स्थिर असली तरी संशयित रुग्णांची संख्या वाढत आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे चार पॉझिटिव्ह सोडल्यास इतर सर्व नमुने निगेटिव्ह आले आहेत. सोमवारी विलगीकरण कक्षात आलेल्या ७७ संशयित रुग्णांसह मेयो, मेडिकलसह इतर जिल्ह्यातून तब्बल ९४ संशयित रुग्णांची नोंद झाली. यातील पहिल्या टप्प्यात १७ संशयिताचे नमुने तपासण्यात आले असता ते निगेटिव्ह आले. तर दुसऱ्या टप्प्यात २६वर नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. सध्या मेयोमध्ये सहा तर मेडिकलमध्ये १५ संशयितांना दाखल केले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी शासनाचे युद्धस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. काही नागरिक याला प्रतिसाद देत असले तरी काहींना याबाबत गंभीरता नाही. यामुळे सोमवारपासून शासनाने कठोर पावले उचलले आहेत. संचारबंदी लागू केली आहे. याचा प्रभाव कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डॉक्टरांनी लोकांना घराबाहेर न पडण्याची, वारंवार हात धुण्याची, सर्दी-खोकला-ताप असलेल्या रुग्णांनी तोंडावर मास्क बांधून तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या ७७ प्रवाशांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. या संशयित रुग्णांसोबतच ९४ संशयितांची नोंद करण्यात आली. यातील पहिल्या टप्प्यात आलेल्या १७ नमुन्यांमध्ये चार अकोला, चार मेडिकल, तीन मेयो, तीन अमरावती, दोन गडचिरोली व एक गोंदिया येथून नमुने आले होते. हे सर्वच नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर दुसऱ्याटप्प्यात २६ नमुने तपासणीसाठी आले. याचा अहवाल रात्री उशिरा येण्याची शक्यता आहे.
विलगीकरण कक्षात १६४ प्रवासी
सिव्हिल लाईन्स येथील आमदार निवासाला विलगीकरणाचे स्वरूप देण्यात आले आहे. या प्रवाशांसाठी इमारत क्र. १ येथे १५० तर इमारत क्र. २ मध्ये ५० खोल्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. रविवारी इमारत क्र. १ येथे ८७ प्रवासी थांबले होते. सोमवारी यात ७७ प्रवाशांची भर पडल्याने यांची संख्या १६४ झाली आहे. यातील सहा रुग्णांना मेयोमध्ये पाठविण्यात आले. सध्या १५८ प्रवासी विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहेत.
मेयो, मेडिकलमध्ये १५ संशयित दाखल
मेडिकलमध्ये आज दोन पुरुष व सात महिलांसह नऊ संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले. यात ३३ वर्षीय पुरुषाची पार्श्वभूमी अमेरिका प्रवासाची आहे तर ६६ वर्षीय पुरुष हे वैद्यकीय कर्मचारी आहेत. महिलांमध्ये ४२ वर्षीय, ४१ वर्षीय, ५० वर्षीय, २७ वर्षीय, ३२ वर्षीय व ३८ वर्षीय व ४० वर्षीय महिला आहेत.

Web Title: 94 suspected coronary disease patients in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.