धुक्यामुळे उपराजधानीतील ८ रेल्वेगाड्या ‘लेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 11:12 AM2020-01-13T11:12:17+5:302020-01-13T11:12:46+5:30

उत्तर भारतासह विविध भागात कडाक्याची थंडी आणि दाट धुके पडल्यामुळे रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे.

8 trains Late in sub-capital due to fog | धुक्यामुळे उपराजधानीतील ८ रेल्वेगाड्या ‘लेट’

धुक्यामुळे उपराजधानीतील ८ रेल्वेगाड्या ‘लेट’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उत्तर भारतासह विविध भागात कडाक्याची थंडी आणि दाट धुके पडल्यामुळे रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. त्यामुळे अनेक रेल्वेगाड्यात १ ते ११ तास उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. रविवारी ८ रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत होत्या. यात १२५९१ गोरखपूर-यशवंतपूर एक्स्प्रेस ११.४० तास, १२२९५ बंगळुर-दानापूर संघमित्रा एक्स्प्रेस १.३० तास, २२६९२ हजरत निजामुद्दीन-बंगळुर राजधानी एक्स्प्रेस १.२० तास, १२६१६ नवी दिल्ली-चेन्नई १ तास, १२५७८ म्हैसुर-दरभंगा बागमती एक्स्प्रेस ४ तास, १२६२१ चेन्नई-नवी दिल्ली तामिळनाडु एक्स्प्रेस १ तास, १२७२३ तेलंगाना एक्स्प्रेस ४ तास लेट होती.

Web Title: 8 trains Late in sub-capital due to fog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.