७० वर्षांच्या सुपरआजी सायकलवरून निघाल्या भारतभ्रमणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 01:58 PM2020-07-02T13:58:07+5:302020-07-02T14:13:35+5:30

आजच्या या स्पर्धेच्या युगात महिलाही कुठे कमी नाहीत हाच संदेश घेऊन आजीबाईंनी हा भारत भ्रमंतीला निर्धार ७० व्या वर्षी केला आहे.

The 70-year-old Super grandmother set out on a bicycle tour of India | ७० वर्षांच्या सुपरआजी सायकलवरून निघाल्या भारतभ्रमणाला

७० वर्षांच्या सुपरआजी सायकलवरून निघाल्या भारतभ्रमणाला

googlenewsNext
ठळक मुद्देआतापर्यंत ४ हजार कि.मी.चा प्रवास केला

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : बुलडाणा जिल्ह्यातील एक ७० वर्षीय सुपरआजी चक्क सायकलवर खामगाव तालुक्यातून भारत भ्रमंतीला निघाली आहे. आता पर्यंत या सुपरआजीने माहूरगड, तसेच वैष्णव देवी पर्यंतचा तब्बल ४ हजार किलोमीटरचा प्रवासी मागील दोन वर्षात पूर्ण केला असून यावर्षी वैष्णोदेवीच्या पुढे जाऊन अमरनाथची यात्रा सायकलने पूर्ण करणार आहे. आजी 21 जून रोजी निघाल्या असून त्या साधारण 22 जुलेला पोहचणार आहेत.

रेखा जोगळेकर असे या सुपरआजींचे नाव असून समाजात सुपर आदर्श घडवत आजीबाईने एम.ए.बी.एड. पर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. अगोदर पासूनच संसाराची धुरा सांभाळत जिल्हा परिषदला तब्बल 30 वर्ष केंद्रप्रमुख म्हणून कामसुद्धा या सुपर आजीने केलं आहे. त्यामुळे संसाराचा गाडा यशस्वीरित्या ओढून झाल्यानंतर आपल्या निवृत्तीनंतर काहीतरी अनोखं करण्याची जिद्द घेऊन ह्या सुपरआजींनी गेल्या 3 वर्षांपासून हा त्यांचा भारत भ्रमंतीचा प्रवास सुरु केला आहे. ह्या वयात काहीतरी हटके करून दाखवण्याची प्रेरणा आजीबाईंना त्यांच्या आईकडून मिळाली असल्याचं आजीबाई सांगतात..

अगदी ७० व्या वर्षी ठणठणीत दिसणाऱ्याा सुपरआजीचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा असे या सुपरआजीला वाटते, आजच्या या स्पर्धेच्या युगात महिलाही कुठे कमी नाहीत हाच संदेश घेऊन आजीबाईंनी हा भारत भ्रमंतीला निर्धार ७० व्या वर्षी केला आहे.
नाथ प्लॉट खामगाव येथील रहिवासी असलेले योगेश जोगळेकर हे आजीचे एकमेव चिरंजीव आहेत, ते सध्या यवतमाळ येथे काम करतात.

अगदी पावसाळ्याचा सुरवातीला हा भारत भ्रमंतीला प्रवास सुरु होऊन पुढे अनेक राज्य पार करत आजी दररोज शरीर साथ देईल तितका प्रवास करत असतात, व रात्री एखादी मौक्याची जागा पाहत विश्रांती घेतात, प्रत्येक गावात या सुपर आजीचं स्वागत केल्या जातं, ठिकठिकाणी या सुपर आजीला मदतही मिळत असते, त्यामुळे तब्बल 2000 किलोमीटर चा हा सायकल प्रवास आजीबाईंना आनंददायी असाच वाटतो...

Web Title: The 70-year-old Super grandmother set out on a bicycle tour of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.