नागपुरात ५८ लिटर देशी दारू जप्त; १३ आरोपी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 03:31 PM2019-12-02T15:31:43+5:302019-12-02T15:32:11+5:30

राज्य उत्पादन शुल्क विभागाने अजनी, कळमना व गिट्टीखदान पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात अवैध मद्य विक्री ठिकाणी छापे टाकून ५८ लिटर देशी दारु व १७२ लिटर मोहा दारु जप्त करुन १३ आरोपींना ताब्यात घेतले व २७ हजार ३६ किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

58 liters of indigenous liquor seized in Nagpur; 13 accused in custody | नागपुरात ५८ लिटर देशी दारू जप्त; १३ आरोपी ताब्यात

नागपुरात ५८ लिटर देशी दारू जप्त; १३ आरोपी ताब्यात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने अजनी, कळमना व गिट्टीखदान पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात अवैध मद्य विक्री ठिकाणी छापे टाकून ५८ लिटर देशी दारु व १७२ लिटर मोहा दारु जप्त करुन १३ आरोपींना ताब्यात घेतले व २७ हजार ३६ किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
यावेळी (१) श्रावण सखाराम वरखडे (२) कोस्तुभ अशोक वाघमारे (३) मोहम्मद नाजीर मोहम्मद जुनेद शेख (४) सुशीला कमिला गुरडे (५) दुर्गा वामन गोखळे (६) संतोष बाबुलाल शिरसार (७) लक्ष्मण श्रीरामजी अळमारे (८) गीता जगदिश बेळेकर (९) दुर्गा प्रमोद बिजळेकर (१०) विनोद नाजुकराव भोजळे (११) राजेशविंग रामखय्यन चंदेव (१२) प्रवीण खेमराज कोठारे (१३) प्रमिला धनश्याम रेकाम यांच्या वर महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ नुसार कारवाई करण्यात आली.
सदरची कारवाई अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या आदेशा नुसार निरीक्षक रावसाहेब कोरे यांनी केली. या कारवाईत दुय्यम निरीक्षक दिलीप बडवाईक, अरक प्रशांत येरपुडे व कवडू रामटेके, जवान राहुल पवार, निलेश पांडे, महादेव कांगणे, महिला जवान सोनाली खांडेकर व वाहन चालक रवीन्द्र निकाळजे यांनी भाग घेतला.
 

Web Title: 58 liters of indigenous liquor seized in Nagpur; 13 accused in custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.