नागपुरात मास्क न लावणाऱ्या ५१६ नागरिकांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 10:48 PM2020-09-11T22:48:27+5:302020-09-11T22:50:05+5:30

शुक्रवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार ५१६ नागरिकांविरुद्ध कारवाई केली असून त्यांच्याकडून १ लाख ०३ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील आठ दिवसात शोध पथकांनी ३४९९ नागरिकांविरुद्ध कारवाई करुन ६ लाख ९९ हजार ८०० रु. चा दंड वसूल केला आहे.

516 citizens fined for not wearing mask in Nagpur | नागपुरात मास्क न लावणाऱ्या ५१६ नागरिकांना दंड

नागपुरात मास्क न लावणाऱ्या ५१६ नागरिकांना दंड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात रुग्णांची संख्या सतत वाढत आहे तसेच मृतांची संख्या पण वाढत चालली आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी महापालिकेचे उपद्रव शोध पथक शहरात आठ दिवसापासून मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांविरुद्ध कारवाई करत आहे. शुक्रवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार ५१६ नागरिकांविरुद्ध कारवाई केली असून त्यांच्याकडून १ लाख ०३ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील आठ दिवसात शोध पथकांनी ३४९९ नागरिकांविरुद्ध कारवाई करुन ६ लाख ९९ हजार ८०० रु. चा दंड वसूल केला आहे.
नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी वारंवार मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ. ची सूचना नागपूर मनपाव्दारे वारंवार केली जात आहे. तरीसुध्दा नागरिक मास्कशिवाय फिरत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून मास्क न घातल्याबददल २०० रुपये दंड आकारण्यात येत आहे.

शुक्रवारी केलेली कारवाई
लक्ष्मीनगर झोन अंतर्गत ५९, धरमपेठ झोन अंतर्गत १०६, हनुमाननगर झोन ४०, धंतोली झोन ४९, नेहरुनगर ४१, गांधीबाग ३५, सतरंजीपुरा ३०, लकडगंज ३५, आशीनगर ४२, मंगळवारी ७५ आणि मनपा मुख्यालयात ४ जणांविरुद्ध शुक्रवारी ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

आठ दिवसात झोननिहाय कारवाई
लक्ष्मीनगर - २६४
धरमपेठ - ८४१
हनुमाननगर - २६८
धंतोली -३७१
नेहरुनगर - २२१
गांधीबाग -२४३
सतरंजीपूरा - २११
लकडगंज - २१७
आशीनगर - ३३५
मंगळवारी - ४९४
मनपा मुख्यालय - ३४

Web Title: 516 citizens fined for not wearing mask in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.