नागपुरात ४०० टन बटाटे आणि ३०० टन कांदे विक्रीविना शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 12:10 AM2020-03-21T00:10:57+5:302020-03-21T00:13:37+5:30

गुरुवारी ५० ट्रक बटाटे (एक ट्रक १६ ते २० टन) आणि ३० पेक्षा जास्त ट्रकची आवक झाली. विक्रीविना ४०० टन बटाटे आणि ३०० टन कांदे बाजारात शिल्लक आहेत. त्यामुळे भाव घसरले आहेत.

400 tonnes of potatoes and 5 tonnes of onion balance in Nagpur without sale | नागपुरात ४०० टन बटाटे आणि ३०० टन कांदे विक्रीविना शिल्लक

नागपुरात ४०० टन बटाटे आणि ३०० टन कांदे विक्रीविना शिल्लक

Next
ठळक मुद्देकोरोनामुळे विक्री घटली : शेतकऱ्यांकडून आवक वाढली

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : येथील कळमन्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमध्ये तीन दिवसांपासून कांदे-बटाट्यांची आवक अचानक वाढली आहे. तर दुसरीकडे ग्राहकांनी खरेदी कमी केली आहे. गुरुवारी ५० ट्रक बटाटे (एक ट्रक १६ ते २० टन) आणि ३० पेक्षा जास्त ट्रकची आवक झाली. विक्रीविना ४०० टन बटाटे आणि ३०० टन कांदे बाजारात शिल्लक आहेत. त्यामुळे भाव घसरले आहेत.
कळमन्यात २० रुपये किलोवर गेलेले दर्जेदार कांदे १५ रुपये आणि बटाटे १८ रुपयांवरून १५ रुपयांपर्यंत उतरले आहेत. ठोकमध्ये भाव उतरल्याचा फायदा किरकोळमध्ये ग्राहकांना मिळत नाही. त्यांच्याकडे जास्त भावात खरेदी केलेला साठा असल्याने किरकोळ विक्रेते भाव कमी करण्यास तयार नाहीत. रेस्टॉरंट आणि हॉटेल्स ३१ मार्चपर्यंत बंद असल्याने कांदे-बटाट्यांचा साठा करण्यास कुणीही तयार नाही. याशिवाय ग्राहकांकडून खरेदी कमी झाली आहे. त्यामुळे भाव आणखी कमी होणार असल्याचे अडतियांनी सांगितले. बाजारपेठा बंद राहण्याच्या अफवांमुळे लोकांनी आधीच जास्त खरेदी केली आहे. त्यामुळे ग्राहक आवश्यक तेवढीच भाजी करीत आहेत.
आज पुन्हा वाढणार कांदे-बटाट्यांची आवक
शुक्रवारी कळमना कांदे-बटाटे बाजारपेठ बंद आहे. आधीच माल पडून आहे. शनिवारी आवक मोठ्या प्रमाणात होणार आहे. कांदे आणि बटाटे चार ते पाच दिवस टिकणारे आहेत. आवकीच्या प्रमाणात मागणी कमी असल्याने माल विक्रीविना पडून राहण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे अडतिया आणि व्यापारी मालाची ऑर्डर कमी करण्याच्या तयारीत आहेत. पूर्वीच शिल्लक असलेला माल विकण्याची व्यापाऱ्यांची तयारी आहे. कळमन्यात अन्य राज्यात आणि जिल्ह्यामध्येही पुरवठा कमी झाला आहे.
देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्रासह अनेक राज्ये सरकारांनी लोकोपयोगी निर्णय घेतले आहेत. बाजारपेठा बंद राहण्याची भीती व्यापाऱ्यांमध्ये आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या बाजारपेठा वगळता रेस्टॉरंट, मॉल आणि अन्ये दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचाच परिणाम म्हणून शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी गुरुवारी मोठ्या प्रमाणात कांदे-बटाटे विक्रीसाठी कळमना बाजारात पाठविले. पण मागणीपेक्षा जास्त माल बाजारात आल्याने कांदे-बटाट्यांचा साठा शिल्लक आहे.
फळांची आवक वाढली
सध्या कळमन्यात संत्री, सफरचंद आणि अननसाची आवक वाढली आहे. ग्राहक नसल्याने फळे मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीविना शिल्लक आहेत. दिवसेंदिवस आवक वाढत आहे. विक्री कशी करायची, याची चिंता व्यापाऱ्यांना सतावत आहे.

Web Title: 400 tonnes of potatoes and 5 tonnes of onion balance in Nagpur without sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.