नागपुरात २३६ अतिक्रमणे हटविली, अवैध बांधकाम तोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 10:24 PM2021-02-26T22:24:27+5:302021-02-26T22:26:22+5:30

Encroachments removed शहरात मनपाच्या अतिक्रमणविरोधी पथकातर्फे शुक्रवारीही कारवाई करण्यात आली. या वेळी विविध झोन अंतर्गत २३६ अतिक्रमणे हटविण्यात आली. या वेळी ४ ट्रक सामान, ५ ठेले जप्त करण्यात आले. तसेच १६ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

236 encroachments removed in Nagpur, illegal constructions demolished | नागपुरात २३६ अतिक्रमणे हटविली, अवैध बांधकाम तोडले

नागपुरात २३६ अतिक्रमणे हटविली, अवैध बांधकाम तोडले

Next
ठळक मुद्देचार ट्रक सामान, ५ ठेले जप्त : १६ हजार रुपयांचा दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरात मनपाच्या अतिक्रमणविरोधी पथकातर्फे शुक्रवारीही कारवाई करण्यात आली. या वेळी विविध झोन अंतर्गत २३६ अतिक्रमणे हटविण्यात आली. या वेळी ४ ट्रक सामान, ५ ठेले जप्त करण्यात आले. तसेच १६ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

लक्ष्मीनगर झोन अंतर्गत लक्ष्मीनगर ते अभ्यंकरनगर, वर्धा रोड, देवनगर, पांडे ले-आऊटपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंची ४३ अतिक्रमणे हटविण्यात आली. तसेच ३१०० रुपये दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोनमध्ये त्रिशरण चौक ते शताब्दी चौक, मानेवाडा चौक, गणेशपेठ बस स्थानक, मेडिकल चौक, टीबी वाॅर्डपर्यंत फुटपाथवरील ४४ अतिक्रमणे हटविली. एक ट्रक सामान जप्त केले.

सतरंजीपुरा झोनमध्ये शांतिनगर ते मस्कासाथ, मारवाडी चौक, दही बाजारापर्यंत फुटपाथवरून ४६ अतिक्रमणे हटविण्यात आली. मस्कासाथमध्ये एक अनधिकृत घरही तोडण्यात आले. लकडगंज झोनमध्ये संभावना चौक ते पारडी नाग नदी पूल, मिनिमातानगर, राजीवनगर, जैन दुरानीपर्यंत ३६ अतिक्रमणे हटविण्यात आली. १६ शेड तोडून ६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मंगळवारी झोन अंतर्गत नारा, आयरननगर येथील दिलीप रामटेके यांचे हायटेन्शन लाइनखाली येणारे अतिरिक्त बांधकाम तोडण्यात आले. यानंतर नारा घाट ते भीम चौक, जरीपटका पोलीस ठाणे, भीम चौक ते १२ खोली चौक, जरीपटका बस स्थानक, गोंडवाना रोडपर्यंत ५६ अतिक्रमणे हटवून एक ट्रक सामान जप्त करण्यात आले. ७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

त्याचप्रकारे हनुमाननगर झोनमध्ये दुपारी ३ वाजेपासून अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू करण्यात आली ती रात्री ११ वाजेपर्यंत सुरू होती. येथील तुकडोजी पुतळा चौक ते क्रीडा चौक, रेशिमबाग चौक, क्रीडा चौकपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे अतिक्रमण हटवून २ ट्रक सामान जप्त करण्यात आले.

अतिक्रमणविरोधी पथकावर दगडफेक, वाहनांच्या काचा फोडल्या

गुरुवारी नेहरूनगर झोन अंतर्गत गोरा कुंभार चौक, केडीके टी पाॅइंट, बीएसएनएल कार्यालय परिसर येथे अतिक्रमणविरोधी कारवाई करताना रात्री ८.३० ते ९ वाजताच्या दरम्यान कुमार बावनकर (४०) व त्याच्या ३० ते ४० साथीदारांनी अतिक्रमणविरोधी पथकावर दगडफेक केली. यात न्युसेन्स डिटेक्शन स्क्वॉडचे कैलाश येनुरकर, संजय रेहपाडे आणि राणाप्रताप सिंह जखमी झाले. दगडफेकीत मनपा वाहन क्र. एमएच ३१ डब्ल्यू ५३०५, जिप्सी वाहन क्रमांक एमएच ३१ एजी ९६८२ आणि जेसीबी वाहन क्रमांक एमएच ३१ डीझेड ०५३० च्या काचा फोडण्यात आल्या. पथकातील सदस्यांनुसार कारवाई दरम्यान एका महिलेने त्यांना शिवागाळ करीत गर्दीला भडकावण्याचा प्रयत्न केला. ही कारवाई नंदनवन पाोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख व त्यांच्या पथकाने केली. या प्रकरणाची तक्रार पोलिसात करण्यात आली आहे.

Web Title: 236 encroachments removed in Nagpur, illegal constructions demolished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.