३० पैकी २० उमेदवारांना हजार मतेही नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 09:26 PM2019-05-24T21:26:02+5:302019-05-24T21:27:18+5:30

नागपूर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत एकूण ३० उमेदवार उभे होते. सर्वांनीच निवडणुकीत जोर लावला. प्रचार-प्रसार केला. आपल्या विजयाचे दावेही केले. परंतु गुरुवारी जशी मतमोजणी झाली, आश्चर्यचकित करणारे निकाल हाती आले. ३० पैकी २० उमेदवार एक हजार मतेही मिळवू शकले नाहीत.

20 out of 30 candidates do not have thousands of votes | ३० पैकी २० उमेदवारांना हजार मतेही नाहीत

३० पैकी २० उमेदवारांना हजार मतेही नाहीत

Next
ठळक मुद्देनागपूर लोकसभा मतदारसंघ 

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत एकूण ३० उमेदवार उभे होते. सर्वांनीच निवडणुकीत जोर लावला. प्रचार-प्रसार केला. आपल्या विजयाचे दावेही केले. परंतु गुरुवारी जशी मतमोजणी झाली, आश्चर्यचकित करणारे निकाल हाती आले. ३० पैकी २० उमेदवार एक हजार मतेही मिळवू शकले नाहीत.
यांना मिळाले ५०० पेक्षा कमी मते
देश जनहित पार्टीच्या दीक्षिता आनंद टेंभुर्णे यांना २७३ मते मिळाली. पीपल्स पार्टी ऑफ इंडिया ( डेमोक्रेटिक )च्या डॉ. मनिषा बांगर यांना ४००, सीपीआय (मार्क्सवादी -लेनिनवादी) रेड स्टारचे योगेश कृष्णराव ठाकरे यंना २८१ मते मिळाली. अखिल भारतीय मानवता पार्टीच्या वनिता जितेंद्र राऊत यांना ४८० मते मिळाली. हम भारतीय पार्टीचे विठ्ठल नानाजी गायकवाड यांना ४८२ मते मिळाली. अपक्ष उमेदवारांमध्ये अ‍ॅड. उल्हास शालिकर दुपारे यांना २९९, कार्तिक गेंदालाल डोके यांना १८१, दीपक लक्ष्मणराव मस्के २३५, प्रफुल्ल माणिकचंद भांगे यांना ३५९, प्रभाकर कृष्णाजी सातपैसे यांना १५६, मनोज कोथुजी बावने यांना ३३१, सचिन हरिदास सोमकुंवर यांना २२७, सतीश विठ्ठल निखार यंना २३७, सिद्धार्थ आसाराम कुर्वे यांना २४७ आणि सुनील सूर्यभान कवाडे ४१७ मते मिळाली.
१ हजार मतापासून राहिले वंचित
बहुजन मुक्ती पार्टीचे अली अशफाक अहमद यांना या निवडणुकीत ७२४ मते मिळाली. मायनॉरिटीज डेमोक्रेटिक पार्टीचे असीम अली यांना ६७३ मते मिळाली. अखिल भारतीय सर्व धर्म समाज पार्टीचे डॉ. विनोद काशीराम बडोले यांना ३३५ मते मिळाली. रुबेन डोमेनिक फ्रान्सिस यांना ६०८ मते मिळाली तर अपक्ष सचिन जागोराव पाटील यांना ६३३ मते मिळाली.
रामटेकची स्थिती चांगली
नागपूर लोकसभा मतदार संघाच्या तुलनेत रामटेक लोकसभा मतदार संघात एकूण १६ उमेदवार मैदानात होते. परंतु येथील उमेदवारांची स्थिती नागपूरच्या उमेदवारांच्या तुलनेत चांगली राहिली. येथील एकाही उमेदवाराने एक हजारपेक्षा कमी मते घेतली नाहीत.

Web Title: 20 out of 30 candidates do not have thousands of votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.