Join us

कंपनीची कार घेऊन ठगांची ‘झूम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:12 IST

लॉकडाऊनमध्ये रोजगार बुडाल्याने प्रताप, गुन्हा दाखलकंपनीची कार घेऊन ठगांची ‘झूम’लॉकडाऊनमध्ये रोजगार बुडाल्याने प्रताप, गुन्हा दाखललोकमत न्यूज ...

लॉकडाऊनमध्ये रोजगार बुडाल्याने प्रताप, गुन्हा दाखल

कंपनीची कार घेऊन ठगांची ‘झूम’

लॉकडाऊनमध्ये रोजगार बुडाल्याने प्रताप, गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : लॉकडाऊनमध्ये रोजगार बुडाल्याने बनावट कागदपत्रे, सीमकार्डद्वारे झूम कार बुक करून तिची परस्पर विक्री करणाऱ्या दुकलीला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जगदीश बिष्नोई (२३), महेंद्र मोदारा (१९) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकड़ून मुंबईसह मध्य प्रदेश, गुजरातमधून अपहार केलेल्या ६ कार जप्त केल्या आहेत.

जगदीश आणि महेंद्र हे नवी मुंबईच्या उलवे भागात गॅस सिलिंडर डिलिव्हरीचे काम करत होते. अशातच लॉकडाऊन सुरू झाल्याने मार्चमध्ये त्यांनी नवी मुंबई येथून गावी राजस्थानला जाण्यासाठी झूम कार कंपनीची गाडी बुक केली. राजस्थान येथे पोहोचताच गाडीचे जीपीएस सिस्टीम बंद करून गाडी स्वतःच्या फायद्यासाठी वापरू लागले. यातच गेल्या वर्षी ३ नोव्हेबर रोजी अशाच प्रकारे कार बुक करून तिचा अपहार केल्याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

त्यानुसार पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दळवी, पोलीस निरीक्षक दिलीप धामुणसे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला. अशात दोन आरोपी पथकाच्या हाती लागले.

त्यांच्या चौकशीत अटक आरोपी आणि त्यांचे इतर साथीदार ट्रॅव्हल्स राजस्थान येथून मुंबई, नवी मुंबई, गुजरात, मध्य प्रदेश अशा वेगवेगळ्या ठिकाणी गेले. तेथून इतरांच्या नावाने सिमकार्ड, ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्सच्या आधारे झूम कार कंपनीच्या गाड्या भाड्याने घ्यायचे. पुढे तीच वाहने राजस्थान येथे विकल्याचे समोर आले आहे. अटक दुकलीकडून सहा गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांनी या कारचा रंग बदलून बनावट व विनानंबर प्लेट लावून वापर केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.