Join us  

अल्पवयीन मुलाकडून चालत्या रिक्षातून "झिग zag" स्टंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 4:07 AM

कांदिवलीत रिक्षाचालकाला अटकलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : चालत्या रिक्षाच्या दारात बाहेर उभे राहून ''झिग zag'' स्टंट करणाऱ्या एका ...

कांदिवलीत रिक्षाचालकाला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : चालत्या रिक्षाच्या दारात बाहेर उभे राहून ''झिग zag'' स्टंट करणाऱ्या एका मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याची दखल कांदिवली पोलिसांनी घेतली आणि रिक्षाचालकासह स्टंटमनला सोमवारी ताब्यात घेतले.

कांदिवली पश्चिमच्या इस्लाम कंपाउंडमध्ये एक मुलगा चालत्या रिक्षात जीवघेणे स्टंट करत असल्याची माहिती व्हायरल व्हिडीओच्या चौकशीदरम्यान कांदिवली पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलीस निरीक्षक विजय कांदळगावकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने स्थानिक सीसीटीव्हीच्या मदतीन रिक्षा क्रमांक शोधून काढला. त्याच्या मदतीने जोसीम रफिक हवालदार (१८) या रिक्षाचालकापर्यंत पोहोचत चौकशी केली. त्याच्याकडे स्टंट करणाऱ्याबाबत विचारणा केली. त्यानुसार, त्याने गुन्ह्याची कबुली देत, अल्पवयीन मुलाबाबत सांगितले, तसेच तो मोटारसायकलवरूनही असे स्टंट करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांना चौकशीदरम्यान समजले. त्या अल्पवयीन मुलाला अटक करून बालसुधारगृहात पाठविण्यात येणार असल्याचे तपास अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.