Join us  

चक्रीवादळामुळे शून्य सावली दिवसच गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 4:06 AM

मुंबई ढगाळ; दुपारी काही क्षणांसाठीच घेता आला अनुभवलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अरबी समुद्रात उठलेल्या तौत्के चक्रीवादळाचा परिणाम ...

मुंबई ढगाळ; दुपारी काही क्षणांसाठीच घेता आला अनुभव

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अरबी समुद्रात उठलेल्या तौत्के चक्रीवादळाचा परिणाम म्हणून शनिवारी मुंबई दिवसभर ढगाळ होती. या कारणात्सव बहुतांश ठिकाणी मुंबईकरांना शून्य सावली दिवसाचा अनुभव घेता आला नाही. मात्र उपनगरात काही ठिकाणी किंचित ऊन पडल्याने तेथे शून्य सावली दिवसाचा अनुभव घेता आला.

मुंबई शहर आणि उपनगरात शनिवारी दिवसभर हवामान ढगाळ होते. दुपारी किंचित ढगांचे साम्राज्य हटले होते. त्यामुळे येथे काही ठिकाणी तसेच नवी मुंबईतही काही ठिकाणी शून्य सावली दिवसाचा अनुभव घेता आला. दरम्यान, नेहरू विज्ञान केंद्राने आपल्या इमारतीच्या टेरेसवर काही साधनांच्या माध्यमातून शून्य सावली दिवसाचे प्रात्याक्षिक दाखविले. सूर्य डोक्यावर येत असतानाच सावली पायाखाली कशी येते किंवा कशी गायब होते, याचा अनुभव याद्वारे अनेकांना लाईव्ह घेता आला. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सावली कशी साथ सोडते किंवा ती कशी पायाखाली येते, याचीही माहिती केंद्राने विषद केली.

.................................