Join us  

सासरच्या जाचामुळे तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 6:15 AM

लग्नाला चार ते पाच वर्षे झाली. घरातल्या भांडणांमुळे आई-वडिलांना होणारा त्रास पाहवत नाही. मी कंटाळलो आहे.

मुंबई : ‘लग्नाला चार ते पाच वर्षे झाली. घरातल्या भांडणांमुळे आई-वडिलांना होणारा त्रास पाहवत नाही. मी कंटाळलो आहे. शिवाय घटस्फोटासाठी सासरच्यांची १० लाखांची मागणी पूर्ण करणे शक्य नाही, अशी सुसाईड नोट लिहून २९ वर्षांच्या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना धारावीत घडली. लक्ष्मण सोनावणे असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणी त्याच्या पत्नी, सासू-सासºयांविरुद्ध गुरुवारी धारावी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.धारावी म्युन्सिपल चाळीतील शिव गल्लीत सोनावणे हा आई-वडील, भाऊ, बहीण, पत्नीसोबत राहायचा. बुधवारी सायंकाळी ५च्या सुमारास त्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना सुसाईड नोट मिळाली असून त्यात पत्नीच्या जाचाला कंटाळल्याचे त्याने म्हटले आहे. २०१३मध्ये मामाची मुलगी निशा पोळसोबत लक्ष्मणचा विवाह झाला. सुरुवातीपासूनच लक्ष्मण आवडत नव्हता. पत्नी तिच्या माहेरच्या माणसांसोबत लक्ष्मणच्या घरच्यांचा छळ करत होती, अशी तक्रार त्याच्या भावाने दाखल केली आहे.>मानसिक छळलक्ष्मणने सुसाईड नोटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, लग्न झाल्यापासून पत्नी, तिच्या आईवडिलांच्या मदतीने लक्ष्मणच्या अपंग आईला त्रास देत होती. तसेच कुटुंबीयांवर खोटे आरोप करून मानसिक छळ करणे सुरू होते. घटस्फोट देण्यासाठी ६ ते १० लाखांची मागणी करत होती. जाचाला कंटाळून त्याने आत्महत्या केली.