Join us  

Valentines Day : आमच्या प्रेमाची व्याख्याच न्यारी, तरुणाईच्या रिलेशनशीपचं स्टेट्स बिनधास्त अन् लय भारी

By सायली शिर्के | Published: February 14, 2020 2:38 PM

प्रेमात Logic नसतं Magic असतं असं उत्तर आता Common झालंय. खरं प्रेम म्हणजे नेमकं काय? या प्रश्नाचं उत्तर आता हसण्यावारी नेलं जातं. प्रेमाची व्याख्या बदलतेय...

Love is so beautiful & easy म्हणत फेब्रुवारीचं दमदार स्वागत केलं जातं. प्रेमाची हवा आसमंतात विलीन होऊन सर्वच त्यात मंत्रमुग्ध झालेले दिसतात. तरूणाईच्या उत्साहाला, आनंदाला उधाण आल्यामुळे प्रत्येक दिवसाचं सेलिब्रेशन नव्या कल्पकतेसह नव्या ढंगात केलं जातं. फेब्रुवारी महिन्याची उत्सुकता ही केवळ Valentine Day साठी अनेकांना असते. गालावर हास्याची कळी उमलवणाऱ्या, खूप दिवस मनात साठवून राहिलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी, विविध प्रेममय डेजच्या रंगात रंगून जाण्यासाठी तरुणाईच्या आनंदाला पारावारच उरलेला नसतो. प्रेम म्हणजे काय? असं विचारलं तर प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, प्रेमात Logic नसतं Magic असतं असं उत्तर आता Common झालंय.

प्रेमाची प्रकर्षाने आठवण होते ती Valentine Day च्या निमित्ताने. Rose देऊन Propose करून नात्याची सुरुवात करायची नंतर Chocolate, Teddy यासारखे gifts देऊन नातं फुलवून Promise करायचं. Kiss & Hug या प्रेमाच्या दोन पायऱ्या चढत आनंदात आपला Valentine Day साजरा करायचा. मात्र त्यानंतर Slap, Kick, Flirting, Confession, Miss करत शेवटी ब्रेकअपने रंगीन, प्रेममय फेब्रुवारीतील आठवड्याची सांगता करायची. खरं प्रेम म्हणजे नेमकं काय? या प्रश्नाचं उत्तर आता हसण्यावारी नेलं जातं. प्रेमाची व्याख्या बदलतेय... सगळ्यांशीच flirt करायचं असा सध्याच्या प्रेमाचा नवा फंडा. हल्ली ब्रेकअपची पण जोरदार पार्टी दिली जाते. रिलेशनशीपचं स्टेट्सबद्दल अगदी बिनधास्तपणे आजची तरुणाई व्यक्त होते. 

खरं सांगायचं तर प्रेम अशी भावना आहे की ते व्यक्त करण्यासाठी 14 फेब्रुवारीची म्हणजे व्हॅलेंटाईन डे ची  खास वाट बघण्याची गरज नाही. पण त्यातही एक वेगळी गंमत अनुभवायला आणि रोजच्या रूटीनमधून बाहेर येऊन हलकं फुलकं होऊन मजा करायला हे डेज साजरे करायला देखील काहीच हरकत नाही. रोजचाच दिवस प्रेमाचा आहे असं समजून जगलं तर जगायलाही नक्कीच मजा येईल. सध्याचा प्रेमात दिखावा जास्त असतो. दोस्तीवाला प्यार सध्या प्रेमाचा नवा फंडा आहे. 

- साहिल चव्हाण

ऑनलाईनच्या जमान्यात व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याचं स्वरूप बदललं. आधी व्हॅलेंटाईन डे ला लपून-छपून पार्टनरला भेटणं, पैसे जमवून घेतलेलं गिफ्ट, पार्टनरने दिलेलं गिफ्ट घरच्यांपासून लपवून ठेवायची मजा वेगळीच असायची. आधी जे प्रेम व्हॅलेंटाईन डे ला भेटून व्यक्त केलं जायचं तेच आता gif आणि emoji वापरून सोशल मीडियावर स्टोरी ठेवून व्यक्त केलं जातं. आधी व्हॅलेंटाईन डे ला पार्टनरला कुठे फिरायला घेऊन जायचं हा मोठा प्रश्न असायचा. पण आता डेटिंगमुळे याची क्रेझच कमी झाली आहे.

- मनाली बागुल

 

एकीकडे प्रेमाची व्याख्या काळानुसार बदलत असताना त्या प्रेमाचा एक विकृत चेहराही समोर येतो आहे. ती मला नाही म्हणूच कशी शकते, माझी नाही तर दुसऱ्या कोणाचीच नाही,  तिला मी कायमच संपवणार असं म्हणत भर चौकात हत्या केली जाते. तुमचं जर खरं प्रेम असेल तर त्या व्यक्तीला जगण्याचं, तुम्हाला नाकारण्याचं स्वातंत्र्य द्या. प्रेमाचा खरा अर्थ समजून घ्या आणि भरभरून प्रेम करा. 

- अमेय सावंत

खूप चांगला मित्र हा बॉयफ्रेंड असतोच असं नाही. Love Marriage करणाऱ्या कित्येकांचा काही महिन्यातच Divorce होतो. त्यामुळे लग्न ही भानगडच नको. त्यापेक्षा live in relationship चा विचार केला जातो. आधी फक्त मुलगा आणि मुलगी असं टिपिकल समीकरण असायचं. पण आता असं काहीच नाही. प्रेम, धोका आणि नवा जोडीदार या गोष्टी हल्ली कॉमन झाल्या आहेत. प्रेमाच्या बाबतीत जास्त टेन्शन घेतलं जात नाही. 

- अनुजा शिंदे

प्रेम आणि आकर्षण यातला नेमका फरक समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येकाची प्रेमाची व्याख्या ही वेगवेगळी असते तर अनेकदा सोयीनुसार असते असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. गिफ्ट मिळणार असतील तर व्हॅलेंटाईन डे साजरा करायला हरकत नाही. तरूणाईचा Valentine Day चा उत्साह ही प्रेमाच्या आठवड्यापूरताच सीमीत राहू लागला आहे. 31st, एखादी Party ज्याप्रमाणे साजरी केली जाते. त्यासारखंच  Candle Light Diner  किंवा मग काही तरी हटके पद्धतीने Valentine Day साजरा केला जातो.

- अजिंक्य जाधव

हल्ली नात्यात खूप जास्त मोकळेपणा असतो. सोशल मीडियामुळे सतत कनेक्ट राहता येतं. एकमेकांच्या आवडी-निवडी समजून घेता येतात. प्रेमाची ठरलेली चौकट मोडीत काढून लग्न नाही पण पटेल तो पर्यंत एकत्र राहण्याचा विचार आवर्जून केला जातो. ब्रेकअपचं देखील सेलिब्रेशन केलं जातं. ब्रेकअप आणि त्यानंतर मिळणारा नवा जोडीदार ही गोष्ट आता सर्रास होते. प्रेमासाठी वाटेल ते करणारे ही आता कमीच दिसतात. कारण आता एकाचवेळी काहींना बरेच जण ही आवडतात. 

- जुई शेलार

 

टॅग्स :व्हॅलेंटाईन्स डेव्हॅलेंटाईन वीक