युवक काँग्रेसची नव्याने संघटन बांधणी करणार - सत्यजित तांबे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 05:05 AM2019-11-14T05:05:21+5:302019-11-14T05:05:27+5:30

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशात युवक काँग्रेसचा मोठा हातभार लागला

Youth to build new Congress organization - Satyajit Tambe | युवक काँग्रेसची नव्याने संघटन बांधणी करणार - सत्यजित तांबे

युवक काँग्रेसची नव्याने संघटन बांधणी करणार - सत्यजित तांबे

Next

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशात युवक काँग्रेसचा मोठा हातभार लागला असून पक्षाला आणखी बळकट करण्याचा संकल्प महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी सोडला आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी युवक काँग्रेसने आक्रमकपणे आंदोलने केली, उपक्रम राबवले. त्यापैकी सुपर ६०, वेक अप महाराष्ट्र, मैं भी नायक या उपक्रमांना चांगला प्रतिसाद लाभला. आगामी काळात संघटन मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे तांबे यांनी सांगितले. राज्यभरातील युवकांशी संवाद साधला जाणार आहे. जास्तीतजास्त युवकांना युवक काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची योजना आखण्यात आली आहे. तालुका, जिल्हापातळीवर इच्छुक तरुणांना पदाधिकारी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती युवक काँग्रेसचे सरचिटणीस ब्रीज दत्त यांनी दिली आहे.

Web Title: Youth to build new Congress organization - Satyajit Tambe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.