The young man's life was saved by motorman | मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे तरुणाचे वाचले प्राण 
मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे तरुणाचे वाचले प्राण 

ठळक मुद्देजखमी अवस्थेत पडलेल्या तरुणाला पाहून मोटरमन प्रवीणकुमार कटियार यांनी लोकल थांबविली.स्थानकावरील कर्मचाऱ्यांनी जखमी तरुण पंकज रॉय याला उल्हासनगर रुग्णालयात दाखल केले.

मुंबई - धावत्या लोकलमधून २१ वर्षीय तरुण रेल्वे रुळावर पडला. या जखमी अवस्थेत पडलेल्या तरुणाला पाहून मोटरमन प्रवीणकुमार कटियार यांनी लोकल थांबविली. त्यानंतर तत्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध करून तरुणाचे प्राण वाचविले.

अंबरनाथ-उल्हासनगररेल्वे रुळांदरम्यान एक तरुण पडल्याचे मोटरमनला दिसले. हा तरुण मदतीची याचना करत होता. मोटरमन कटियार यांनी तत्काळ आपत्कालीन ब्रेक लावून लोकल थांबविली. या वेळी गार्ड आणि प्रवाशांनी तरुणाला लोकलच्या डब्यात ठेवले. मोटरमनने उल्हासनगर स्थानकाच्या स्टेशन मास्तरांना माहिती दिली. स्थानकावरील कर्मचाऱ्यांनी जखमी तरुण पंकज रॉय याला उल्हासनगर रुग्णालयात दाखल केले. ही घटना २ नोव्हेंबर रोजी घडली. मोटरमन प्रवीणकुमार कटियार यांच्या सतर्कतेबद्दल त्यांना पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: The young man's life was saved by motorman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.