Join us  

बँकेच्या वसुली एजंटना कंटाळून तरुणाची आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2019 1:05 PM

एचडीएफसी बँकेच्या वसुली एजंटला कंटाळून अमोल वैती नामक तरुणाने दहिसरमध्ये आत्महत्या केली.

- गौरी टेंबकर - कलगुटकर

मुंबई: एचडीएफसी बँकेच्या वसुली एजंटला कंटाळून अमोल वैती नामक तरुणाने दहिसरमध्ये आत्महत्या केली. त्यानी या बँकेचा एजंट निखिल विश्वकर्मा याला त्याच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरविले आहे. 

क्रेडिट कार्डचे पैसे वसूल करण्यासाठी अर्वाच्च भाषेत सतत शिवीगाळ करण्यात येत होती ज्याला कंटाळून वैती यांनी व्हॉट्सअपवर सुसाईड नोट लिहीत ती मित्राना आणि नातेवाईकाना पाठवत आयुष्य संपविले. ते दहिसर पश्चिमच्या कांदरपाडा येथील अमोल निवास याठिकाणी गुरुवारी सकाळी गळफास घेतला. त्यांना पत्नी आणि दोन लहान मुले असून अवघ्या दोन लाख रुपयांसाठी हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असुन चौकशी सुरू आहे.

वैती यांच्या सुसाईड नोटमध्ये एचडीएफसी बँकेचा क्रेडिट कार्ड वसुली एजंट असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानुसार पोलीस याप्रकरणी चौकशी करत आहेत. विश्वकर्मा याला 'लोकमत' ने संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मोबाईल क्रमांक बंद असुन लँडलाईनही बराच वेळ व्यस्त आहे.

टॅग्स :आत्महत्याबँक