'तुम्ही जाहीर सभेचं आयोजन करा, मी येतो'; उद्धव ठाकरेंचा आंदोलकांना पाठींबा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 07:49 PM2022-11-19T19:49:04+5:302022-11-19T19:50:05+5:30

पालघर वाढवण परिसरात सभा घेणार

You organize a public meeting, I come; Uddhav Thackeray supports the protesters of palghar vadhavan bandar | 'तुम्ही जाहीर सभेचं आयोजन करा, मी येतो'; उद्धव ठाकरेंचा आंदोलकांना पाठींबा

'तुम्ही जाहीर सभेचं आयोजन करा, मी येतो'; उद्धव ठाकरेंचा आंदोलकांना पाठींबा

Next

मनोहर कुंभेजकर

मुंबई - एकच जिद्द वाढवण बंदर रद्द!! असा नारा देत प्रस्तावित महाकाय वाढवण बंदर प्रकल्पा विरोधात २१ नोव्हेंबर रोजी केंद्र व राज्य सरकार विरोधात मंत्रालयावर आक्रोश मोर्चात सहभागी होण्यासाठी आंदोलन धारकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेत निवेदन दिले. यावेळी सोमवार २१ नोव्हेंबर रोजी आझाद मैदानावर शिवसेना नेते उपस्थित राहतील. आपण पंधरा दिवसानंतर पालघर जिल्ह्यातील वाढवण परिसरात भव्य सभेचे आयोजन करावे. मी स्वतःच सभेला उपस्थित राहून प्रस्तावित वाढवण बंदर विरोधी आंदोलनात तुमच्या सोबत येईन, असे ठोस आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.

यावेळी शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत व सचिव मिलिंद नार्वेकर यांना मुंबईतील कोळी समाजातील शिवसैनिकांनी सोमवारच्या सदर आंदोलनात सहभागी होण्यासाठी संबंधित विभागप्रमुखांना आदेश देण्याची सूचना ठाकरे यांनी केली. सदर शिष्टमंडळात माजी महापौर मिलिंद वैद्य, वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती सरचिटणीस वैभव वझे, महाराष्ट्र मच्छिमार कृति समितीचे ( एमएमकेएस) सरचिटणीस किरण कोळी, उपाध्यक्ष मोरेश्वर पाटील, सदस्य दर्शना पागधरे, मोरेश्र्वर कोळी, दशरथ चौधरी,  ठाणे जिल्हा मच्छिमार समाज संघाचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र मच्छिमार कृति समितीचे पालघर जिल्हा अध्यक्ष मानेंद्र आरेकर, महाराष्ट्र मच्छिमार कृति समिती पालघर जिल्हा महिला सचिव प्राची नाईक, महाराष्ट्र मच्छिमार कृति समिती पालघर तालुका अध्यक्ष प्रशांत नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
 

Web Title: You organize a public meeting, I come; Uddhav Thackeray supports the protesters of palghar vadhavan bandar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.