Join us  

स्वच्छतेची मॅच आपल्याला खेळायची आहे - सचिन तेंडुलकर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 7:37 AM

मुंबई स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी एकाची नाही. दुसºयाकडे बोट दाखवून स्वच्छता होणार नाही. हीसुद्धा एक मॅच आहे. जी आपल्याला खेळायची आहे. सर्वांनी मिळून प्रयत्न केल्यास नक्कीच बदल दिसेल, असे आवाहन मास्टर ब्लास्टर व खासदार सचिन तेंडुलकर यांनी मुंबईकरांना केले आहे.

मुंबई : मुंबई स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी एकाची नाही. दुसºयाकडे बोट दाखवून स्वच्छता होणार नाही. हीसुद्धा एक मॅच आहे. जी आपल्याला खेळायची आहे. सर्वांनी मिळून प्रयत्न केल्यास नक्कीच बदल दिसेल, असे आवाहन मास्टर ब्लास्टर व खासदार सचिन तेंडुलकर यांनी मुंबईकरांना केले आहे. मुंबईतील गलिच्छ वस्त्यांमध्ये दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून त्यांचा कायापालट करण्यासाठी तेंडुलकर सरसावले आहेत. मिशन २४ अंतर्गत मुंबईतील दुसरी मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असलेल्या देवनार, गोवंडी विभागासाठी ते स्वच्छतादूत बनून आले आहेत. या उपक्रमांतर्गत मुंबई महापालिका, मुंबई फर्स्ट आणि अपनालय या संस्थेमार्फत अशा गलिच्छ वस्त्यांमध्ये सार्वजनिक शौचालय, मलनि:सारण अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.मुंबई कचरामुक्त करण्यासाठी महापालिकेचे अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र मुंबई स्वच्छ होण्यासाठी आधी गलिच्छ वस्त्यांमध्ये पायाभूत सुविधा पुरवणे गरजेचे आहे. ही गरज ओळखून अपनालय आणि मुंबई फर्स्ट या संस्थेने ‘मिशन २४’ ही संकल्पना आखली आहे. ही संकल्पना गलिच्छ वस्त्यांमध्ये राबवण्यासाठी मुंबई महापालिका मदत करीत आहे. तसेच माजी क्रिकेटपटू आणि विद्यमान खासदार सचिन तेंडुलकर यांनी पुढाकार घेतला आहे. या मिशनची घोषणा आयुक्त अजय मेहता व सचिन तेंडुलकर यांनी मुंबई महापालिका मुख्यालयात मंगळवारी केली.या मोहिमेचे स्वच्छतादूत असलेल्या सचिन यांनी मुंबईकरांनाही आपापल्या परिसराचे स्वच्छतादूत होण्याचे आवाहन केले. कचºयापासून मुक्ती हवी असेल तर सर्वांनीच आपापल्या परिसराचे स्वच्छतादूत व्हावे, असे आवाहन सचिनने केले. स्वच्छतादूत म्हणून मला जे काही करता येईल, ते करण्याचा माझा प्रयत्न असेल, असे आश्वासनही दिले.बदल एका दिवसात होत नसतोस्वच्छतादूत म्हणून मला जे काही करता येईल ते सर्व करण्याची माझी तयारी आहे. आजही मुंबईत अनेक ठिकाणी रहिवासी आपल्या घराच्या खिडकीतून कचरा बाहेर फेकून देतात. ही बाब मला खटकल्याने मी त्यावर तोडगा काढण्यासाठी पुढे आलो आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की, बदल एका दिवसात होत नसतो, त्यासाठी सातत्याने प्रयत्न होणे गरजेचे आहे. सर्वांनी मिळून प्रयत्न केल्यास नक्कीच बदल दिसतील, असा विश्वासही सचिन यांनी या वेळी व्यक्त केला.‘मिशन २४’मध्ये काय? : एम पूर्व म्हणजेच शिवाजी नगर, गोवंडी या विभागांतील रहिवाशांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारण्यासाठी मिशन २४ अंतर्गत प्रयत्न होणार आहेत. दोन वर्षांमध्ये या विभागाचा कायापालट करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.कचºयाची विल्हेवाट पालिकाच लावणारझोपड्यांमध्ये पाणी, शिक्षण, आरोग्य, मोकळ्या जागा, गटारे अशा सर्व सुविधा पुरविल्या जाणार आहेत. त्या प्राधान्याने देण्यावर महापालिकेचा भर असेल, तसेच झोपड्यांमध्ये जमा होणारा कचरा महापालिका उचलणार असून त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही पालिकेची राहील, असे पालिका आयुक्त अजय मेहता यांनी या वेळी स्पष्ट केले

टॅग्स :सचिन तेंडूलकरमुंबई महानगरपालिका