Join us  

शासकीय विश्रामगृहात योगी आदित्यनाथ! यूपी भवनमध्ये राहणारे पहिलेच मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 1:33 AM

नवी मुंबईतील यूपी भवन या शासकीय विश्रामगृहामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारची संपूर्ण रात्र काढल्याचे उघडकीस आले आहे. यूपी भवनमध्ये रात्र काढणारे योगी आदित्यनाथ पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहेत.

मुंबई : नवी मुंबईतील यूपी भवन या शासकीय विश्रामगृहामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारची संपूर्ण रात्र काढल्याचे उघडकीस आले आहे. यूपी भवनमध्ये रात्र काढणारे योगी आदित्यनाथ पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहेत.मॉरीशस येथील एका कार्यक्रमासाठी मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करण्यासाठी योगी आदित्यनाथ मंगळवारी रात्री १० वाजता मुंबईत आले होते. मात्र विमानाची वेळ सकाळची असल्याने भाजपाच्या काही मोजक्याच कार्यकर्त्यांसोबत त्यांनी रातोरात नवी मुंबईतील यूपी भवन गाठले. पहाटे ४ वाजेपर्यंत आराम केल्यानंतर ५ वाजता ते पुन्हा विमानतळावर पोहचले. विमानतळानजीक असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबवण्याऐवजी योगी आदित्यनाथ यांनी शासकिय विश्रामगृहाचा पर्याय निवडल्याने सर्वच कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या. साधे राहणीमान आणि उच्च विचारांना मानणारे योगी आदित्यनाथ कुठेही गेले, तरी योगी धर्माचे पालन करतात, अशी माहिती मुंबई भाजपाचे महामंत्री अमरजीत मिश्र यांनी दिली.मिश्र यांनी सांगितले की, या विश्रामगृहाचे उद्घाटन केल्यानंतर समाजवादाच्या बाता मारणारे तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादवही या ठिकाणी न थांबता मुक्कामासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये गेले होते. योगायोग म्हणजे येथील विश्रामगृहात मुक्का करण्यासह प्रवासी दिनासाठी मॉरिशियसच्या पोर्ट लुईसच्या कार्यक्रमात सामील होणारे योगी आदित्यनाथ पहिलेच मुख्यमंत्री आहेत.

टॅग्स :योगी आदित्यनाथ