Join us  

यंदापासून विद्यापीठाचा निकाल गुणपत्रिकांसह

By admin | Published: July 20, 2014 2:28 AM

मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येणा:या परीक्षांचे निकाल यापूर्वी केवळ पास किंवा नापास असे लावण्यात येत असत.

मुंबई : मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येणा:या परीक्षांचे निकाल यापूर्वी केवळ पास किंवा नापास असे लावण्यात येत असत. परंतु नवनियुक्त परीक्षा नियंत्रकांनी यामध्ये सुधारणा घडवून आणत विद्यापीठाचे निकाल यंदापासून गुणपत्रिकांसह लावण्यात यश मिळविले आहे. विद्यापीठाच्या इतिहासात यंदा काही अभ्यासक्रमांचे निकाल गुणपत्रिकांसह  जाहीर करण्यात आले आहेत. विद्यापीठामार्फत एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या टीवायबी़एस्सी सेमिस्टर पाचचा निकाल नुकताच जाहीर केला आहे. यापूर्वी विद्यापीठाने टीवाय बी.कॉमचा निकाल जाहीर केला आहे. मात्र विद्यार्थीसंख्या अधिक असल्याने परीक्षा विभागाने हे निकाल जुन्या पद्धतीनुसार जाहीर केले. विद्यार्थी पास की नापास एवढीच माहिती जुन्या पद्धतीनुसार संगणकावर पाहता येत होती. मात्र विद्यापीठाचे नवनियुक्त परीक्षा नियंत्रक दिनेश भोंडे यांनी ही पद्धत मोडीत काढत गुणपत्रिकांसह निकाल पाहता यावेत, यासाठी प्रयत्न केले आणि यामध्ये परीक्षा विभागाला यश आले आहे. (प्रतिनिधी)