मराठी भाषेच्या आग्रहासाठी लेखिकेचं तब्बल १८ तास ठिय्या आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 06:11 AM2020-10-10T06:11:00+5:302020-10-10T06:51:46+5:30

सराफाचा मराठीतून बोलण्यास नकार; शोभा देशपांडे दुकानाबाहेर तब्बल १८ तास थांबल्या

Writer Shobha Deshpande protests for 18 hours after jeweler refuses to speak in Marathi | मराठी भाषेच्या आग्रहासाठी लेखिकेचं तब्बल १८ तास ठिय्या आंदोलन

मराठी भाषेच्या आग्रहासाठी लेखिकेचं तब्बल १८ तास ठिय्या आंदोलन

Next

मुंबई : सराफा दुकानदारास मराठी बोलता येत नसल्याने लेखिका शोभा देशपांडे यांनी मराठीच्या आग्रहासाठी केलेले ठिय्या आंदोलन चर्चेचा विषय ठरले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील या आंदोलनाची दखल घेत शोभाताईंशी संवाद साधला.

कुलाबा येथील महावीर ज्वेलर्सकडे देशपांडे गुरुवारी गेल्या होत्या. मात्र, ज्वेलर्सने मराठीत संभाषण साधण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त होत त्यांनी दुकानासमोर ठिय्या मांडला. तब्बल १८ तास हा लढा सुरू असतानाच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शुक्रवारी सकाळी घटनास्थळी धाव घेतली. झालेल्या गैरप्रकाराबद्दल सराफाला मराठीतून माफी मागण्यास सांगितले. सराफाने माफी मागितल्यानंतर शोभातार्इंनी आपले आंदोलन मागे घेतले. सोशल मीडियात याची दिवसभर चर्चा होती. दुकानदाराने मराठीतून माफी मागितल्यानंतर देशपांडे दुकानाचा परवाना दाखविण्यावर ठाम होत्या. अखेर, पोलिसांसह मनसे कार्यकर्त्यांनी देशपांडेंची समजूत काढून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले.

मराठीची परीक्षा घ्या सर्वांच्या मराठीच्या परीक्षा घ्या. मराठीशिवाय दुसरी भाषा वापरायची नाही, असे शोभा देशपांडे यांनी यावेळी सांगितले.

...तर मनसे स्टाइल धडा शिकवणार
शोभा देशपांडे यांना मधुमेहाचा त्रास आहे. त्यांनी रात्रीपासून काहीही खाल्ले नव्हते. आम्ही त्यांना चहा, नाश्ता देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोही त्यांनी घेतला नाही. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. आम्ही त्यांना आंदोलन लवकर मागे घेण्याची विनंती केली. ज्वेलर्सला माफी मागण्यास लावली. त्याला मराठी येत नाही, तोपर्यंत तो दुकान उघडणार नाही, हेदेखील आम्ही बघू. मुजोरी वाढली तर आम्हाला आमच्या पद्धतीने मराठीची शिकवणी द्यावी लागेल.

Web Title: Writer Shobha Deshpande protests for 18 hours after jeweler refuses to speak in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.