Join us  

राज्यातील बंधपत्रित नर्सेसचे कामबंद आंदोलन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 4:40 AM

राज्यातील राज्य कामगार विमा योजना, सार्वजनिक आरोग्य मंत्रालय आणि जिल्हा परिषदेतील बंधपत्रित नर्सेसने ‘कामबंद’ आंदोलन पुकारत, गुरुवारपासून आझाद मैदानात ठिय्या दिला आहे.

मुंबई  - राज्यातील राज्य कामगार विमा योजना, सार्वजनिक आरोग्य मंत्रालय आणि जिल्हा परिषदेतील बंधपत्रित नर्सेसने ‘कामबंद’ आंदोलन पुकारत, गुरुवारपासून आझाद मैदानात ठिय्या दिला आहे. आरोग्य विभागाकडून कायम सेवेत घेण्याबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत ‘कामबंद’ सुरूच ठेवणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघाने दिला आहे.महासंघाचे राज्य महासचिव एस. टी. गायकवाड यांनी सांगितले की, आरोग्य मंत्रालयाने प्रस्ताव दाखल केल्यानंतरही, ग्रामविकास मंत्रालयाने बंधपत्रित नर्सेसना कायम करण्यावर असमर्थता दर्शविली. सार्वजनिक आरोग्य विभागाने १५ एप्रिल २०१५ रोजी अधिसूचना जारी करत, सर्व आरोग्य बंधपत्रित नर्सेसना कायम सेवेत घेण्याचे आदेश दिले होते. हे आदेश राज्य कामगार विमा योजनेतील बंधपत्रित नर्सेसला लागू नसल्याचे सांगत, आयुक्तांनी मंत्रालयातून तसे आदेश आणण्यास सांगितले. परिणामी, या प्रकरणाची चौकशी करून, सर्व बंधपत्रित नर्सेसची विशेष परीक्षा घेऊन सेवा नियमित करण्याची मागणी महासंघाने केली आहे.

टॅग्स :हॉस्पिटलमुंबई