तरुण कर्मचाऱ्यांवर चालणार मंत्रालयाचे कामकाज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 04:37 AM2020-05-18T04:37:53+5:302020-05-18T04:41:18+5:30

मुंबईमधील परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याने मंत्रालय किंवा मुंबईतील अन्य सरकारी कार्यालयांत असलेली कर्मचाºयांची पाच टक्के उपस्थिती वाढवण्याबाबत निर्णय होऊ शकला नाही.

The work of the ministry will be run on young employees | तरुण कर्मचाऱ्यांवर चालणार मंत्रालयाचे कामकाज

तरुण कर्मचाऱ्यांवर चालणार मंत्रालयाचे कामकाज

googlenewsNext

मुंबई : लॉकडाउनमुळे गेले कित्येक दिवस मंत्रालयातील कामकाज ठप्प पडले आहे. केवळ पाच टक्के कर्मचारी उपस्थित असतात. ४० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्याने कामावर बोलवून कामकाजाला गती देता येईल. त्यासाठी अशा कर्मचाºयांची नावे सर्व विभागांनी तातडीने कळवावीत, असे आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
मुंबईमधील परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याने मंत्रालय किंवा मुंबईतील अन्य सरकारी कार्यालयांत असलेली कर्मचाºयांची पाच टक्के उपस्थिती वाढवण्याबाबत निर्णय होऊ शकला नाही. ५ टक्के कर्मचाºयांची उपस्थिती बंधनकारक असली तरीही अनेक कर्मचारी-अधिकारी कोरोनाच्या भीतीमुळे कार्यालयात हजर होत नाहीत असेही निदर्शनास आले आहे. चौथ्या लॉकडाऊनमध्ये आॅनलाइन कामकाजाच्या पयार्यावर सामान्य प्रशासन विभाग तसेच माहिती व तंत्रज्ञान विभाग विचार करीत आहे. त्यासाठी वयाच्या चाळीशीच्या आत असलेल्या तरुण कर्मचाºयांची नावे मागविण्यात आली आहेत.

Web Title: The work of the ministry will be run on young employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.