Join us  

फार्मास्युटिकल कंपन्यांकडून गिफ्ट घेणाऱ्या डॉक्टरांवर वचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 6:02 AM

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी याला फार्मास्युटिकल कंपन्या आणि त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

मुंबई : केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी लोकसभेत नुकतेच फार्मास्युटिकल कंपन्यांकडून काही डॉक्टर्स गिफ्ट्स स्वीकारत असल्याच्या तक्रारी दाखल झाल्याची माहिती दिली. या पार्श्वभूमीवर त्यांनी त्वरित मेडिकल काऊन्सिल आॅफ इंडियाला त्या-त्या राज्य वैद्यकीय परिषदेने याची गंभीर दखल घ्यावी, असे आदेश दिले आहेत. मेडिकल काऊन्सिलकडील तक्रारी संबंधित राज्य वैद्यकीय परिषदेकडे सोपवून त्याविषयी अधिक तपास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच डॉक्टरांच्या या गिफ्ट, पर्यटन पॅकेज घेण्याला वचक बसणार आहे.केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी याला फार्मास्युटिकल कंपन्या आणि त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. फार्मास्युटिकल कंपन्यांमधील वाढत्या स्पर्धेमुळे ही चुकीची व्यावसायिकता या क्षेत्रात रुळत चालल्याचे त्यांनी या वेळी अधोरेखित केले. इंडियन मेडिकल काऊन्सिलच्या २००२ च्या आचारसंहितेप्रमाणे डॉक्टरांना भेटवस्तू, पर्यटन पॅकेज, पैसे किंवा आकर्षक सेवा-सुविधा स्वीकारण्यास मनाई आहे. त्यामुळे या आचारसंहितेचा भंग करणाºया डॉक्टरांवर मेडिकल काऊन्सिल आॅफ इंडिया आणि संबंधित राज्य वैद्यकीय परिषदेने कडक कार्यवाही करण्याचे आदेश केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिले.>तपास करणार...डॉक्टर गिफ्ट्स घेत असल्याच्या मेडिकल काऊन्सिलकडील तक्रारी संबंधित राज्य वैद्यकीय परिषदेकडे सोपवून त्याविषयी अधिक तपास करण्यात येईल.>डॉक्टर नोंदणीकृत आहेत का, याचीही पडताळणीकेंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी सांगितले की, अशा स्वरूपाच्या तक्रारी मेडिकल काऊन्सिलकडे दाखल झाल्या आहेत. त्यांची दखल घेताना हे डॉक्टर्स नोंदणीकृत आहेत का, याचीही पडताळणी केली जाईल. त्यानंतर त्या तक्रारींची चौकशी व तपास करून त्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी सांगितले की, मेडिकल काऊन्सिलकडून वैद्यकीय परिषदेकडे काही तक्रारी आल्यास त्यावर कार्यवाही करण्यात येईल. याविषयी मेडिकल काऊन्सिलच्या परिपत्रकानुसार कारवाई करण्यात येणार आहे.