महिला पोलिसांना मिळाला हक्काचा भाऊ, गृहमंत्र्यांनी साजरी केली अनोखी रक्षाबंधन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 09:16 PM2020-08-03T21:16:50+5:302020-08-03T21:19:34+5:30

गृहमंत्री अनिल देशमुख यांचे महिला पोलीस भगिनींसोबत रक्षाबंधन

The women police got the brother, the Home Minister celebrated a unique Rakshabandhan | महिला पोलिसांना मिळाला हक्काचा भाऊ, गृहमंत्र्यांनी साजरी केली अनोखी रक्षाबंधन

महिला पोलिसांना मिळाला हक्काचा भाऊ, गृहमंत्र्यांनी साजरी केली अनोखी रक्षाबंधन

Next
ठळक मुद्देया सर्व महिला कर्मचाऱ्यांशी चर्चा करून माझ्या पुढील कामांसाठी प्रेरणा व ऊर्जा मिळाली. महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी कर्तव्याबरोबर सामाजिक जाणिवेतून लोकहित जपणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधन साजरे केले.

मुंबई - बंधू येईल माहेरी न्यायाला... नारळी पुनवेच्या ग सणाला.. मात्र सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे हे शक्य नसले तरी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मात्र  महिला पोलीस भगिनीं समवेत रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा केला. आपले घरदार नातेसंबंध बाजूला ठेवून लोकांच्या रक्षणार्थ झटणाऱ्या महिला पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना आज रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने
 

त्यांच्या हक्काचा मोठा बंधू  गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या रुपाने मिळाला पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख या नात्याने  गृहमंत्र्यांनी महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून राखी बांधून घेऊन रक्षाबंधन साजरे केले.  यानिमित्ताने  त्यांनी सर्व महिला पोलीस  अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी  संवाद साधला. त्यांची ,त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस केली.कोविड१९ च्या लढ्यात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आमच्या महिला पोलीस कर्मचारी भगिनी नेटाने लढा देत आहेत. त्यामुळे महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी कर्तव्याबरोबर सामाजिक जाणिवेतून लोकहित जपणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधन साजरे केले.
   

या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात फुटपाथवरील बेघर महिलेला प्रसुती करण्यास मदत करत तिला व तिच्या बाळाला सुखरूप दवाखान्यात भरती करणाऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षक प्रिया गरुड आणि महिला पोलीस शिपाई अस्मिता जाधव उपस्थित होत्या. तसेच पनवेल नजीकच्या ज्ञानाई माध्यमिक विद्यालयातील ५० विद्यार्थ्यांचा १० वी पर्यंतच्या शिक्षणाचा खर्च उचलून त्यांना दत्तक घेणाऱ्या महिला पोलीस नाईक रेहाना शेख यांच्यासोबत मुंबईच्या रस्त्यांवरील अनेक निराधारांना मदतीचा हात देणाऱ्या महिला पोलीस नाईक रंजनी जबारे, तसेच एकाच दिवशी ४ बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या महिला पोलीस नाईक संध्या शिलवंत उपस्थित होत्या. तसेच कोविड१९ च्या काळात कर्तव्य बजावताना कोरोनाने संक्रमित होऊन त्यावर यशस्वीरीत्या मात करणाऱ्या महिला पोलीस शिपाई रुपाली डावके आणि सविता नवघणे सहभागी होत्या.


   

या सर्व महिला कर्मचाऱ्यांशी चर्चा करून माझ्या पुढील कामांसाठी प्रेरणा व ऊर्जा मिळाली. पोलीस दलातील सर्व महिला कर्मचाऱ्यांचा मोठा भाऊ या नात्याने मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने माझ्याकडून मनापासून खूप शुभेच्छा. पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख नात्याने  मला सर्व महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा बरोबरीने महाराष्ट्र पोलीस दलाचा सार्थ अभिमान आहे.असे मनोगत गृहमंत्र्यांनी व्यक्त केले.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना २ वर्ष तडीपारीची नोटीस; ५ जिल्ह्यातून हद्दपार होण्याचे आदेश

 

गोरखपूर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; राम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी

 

नवव्या पतीनं केली हत्या, अनैतिक संबंधांतून गळ्यावरून फिरवला सुरा

 

थरारक! मित्रानेच मित्राची चाकूने भोसकून केली हत्या 

 

"सुशांत सिंग नावाच्या नटाबद्दल बोलणं म्हणजे आयुष्य वाया घालवण्यासारखं आहे" - संभाजी भिडे

Web Title: The women police got the brother, the Home Minister celebrated a unique Rakshabandhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.