Join us

अनैतिक संबंधामुळे पत्नीची हत्या

By admin | Updated: August 13, 2016 04:25 IST

अंधेरी परिसरात एका पस्तीस वर्षीय महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला आहे. या महिलेचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून तिच्या पतीनेच तिची हत्या केल्याचे डी.एन. नगर

मुंबई : अंधेरी परिसरात एका पस्तीस वर्षीय महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला आहे. या महिलेचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून तिच्या पतीनेच तिची हत्या केल्याचे डी.एन. नगर पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाले असून, पतीला अटक करण्यात आली आहे.अंधेरी पश्चिमेकडील जुहू गल्लीच्या धनगरवाडी जंगलात एका महिलेचा मृतदेह आढळल्याचा दूरध्वनी शुक्रवारी पोलिसांना आला. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी सुरु केलेल्या तपासावेळी मृत महिलेचे नाव पार्वती लक्ष्मण लिंगप्पा असल्याचे समोर आले. त्यानुसार तिचा पती लक्ष्मण याला ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी बोलावले. तेव्हा त्याने तिला ओळखले. मात्र यावेळी त्याचे वागणे संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याची चौकशी केली. चौकशीवेळी पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून ६ आॅगस्ट रोजी रात्री ११ वाजता तिची गळा दाबुन हत्या केल्याचे त्याने कबुल केले. आणि तिचा मृतदेह जंगलात आणुन टाकल्याचेही सांगितले. याप्रकरणी लक्ष्मणवर खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे, असे डी.एन. नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनाजी नलावडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)