Join us  

पर्जन्य वाहिन्यांचे रुंदीकरण रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 7:02 AM

वांद्रे येथील कलानगर आणि खेरवाडी परिसरातील रस्त्यालगत असलेल्या नाल्याच्या रुंदीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. पाण्याचा वेळीच निचरा होत नसल्याने या भागात पाऊस थांबल्यानंतरही पाणी तुंबलेले असते.

मुंबई  - वांद्रे येथील कलानगर आणि खेरवाडी परिसरातील रस्त्यालगत असलेल्या नाल्याच्या रुंदीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. पाण्याचा वेळीच निचरा होत नसल्याने या भागात पाऊस थांबल्यानंतरही पाणी तुंबलेले असते. नाला रुंदीकरणाचे काम रखडल्यामुळे यंदाही या भागातील रहिवाशांची पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्यापासून सुटका होणार नसल्याचे समोर आले आहे.वांद्रे येथील कलानगर आणि खेरवाडी परिसरात दरवर्षी पावसाळ्यात पाणी तुंबते. त्यामुळे या भागात पाणी तुंबू नये यासाठी प्रयत्न करण्याची मागणी होत होती. परंतु महापालिकेला त्यावर अद्याप तोडगा सापडला नव्हता. गेल्या वर्षी केलेल्या पाहणीत येथील अरुंद नाल्यामुळेच भरतीच्या वेळी पाऊस पडल्यास या भागात पाणी तुंबत असल्याचे समोर आले. पाण्याचा वेळीच निचरा होत नसल्याने या भागात पाऊस थांबल्यानंतरही पाणी तुंबलेले असते. नाला अरुंद असल्याने पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या कलानगर जंक्शन ते नंदादीप कल्व्हर्टपर्यंतच्या रस्त्यालगतच्या पावसाळी पाणी वाहून नेणाºया वाहिन्यांचे रुंदीकरण करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता. मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर या नाल्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे. या नाल्याचे काम युद्धपातळीवर होणे आवश्यक होते. मात्र नागरिकांना या वर्षीही त्रास सहन करावा लागणार आहे.अतिक्रमणामुळे रखडली कामेओएनजीसी ते खेरवाडीपर्यंत पश्चिम द्रुतगती महामार्गाशेजारी हा नाला आहे. हा नाला ओएनजीसीजवळ आठ मीटर रुंदीचा आहे. परंतु, पुढे खेरवाडीपर्यंत हा नाला अडीच ते चार मीटर एवढाच रुंद आहे. त्यामुळे या नाल्यातील बॉटलनेक काढण्यासाठीचा प्रस्ताव बनवण्यात आला आहे. त्यानुसार त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामुंबई