अनिकेत घमंडी, डोंबिवलीकल्याण-डोंबिबली महापालिकेच्या परिवहन विभागातील भोंगळ कारभारावर प्रशासनाचा वचक नाही, प्रशासन आहे तर ठेकेदारी पद्धत हवीच कशाला? आर्थिक डबघाईतून केडीएमटीला वाचवायचे असेल तर तातडीने ठेकेदारी पद्धत बंद करा अशी भूमिका परिवहन सभापती नित चीन पाटील यांच्तासह बहुतांशी सदस्यांचा आहे. मात्र त्याला प्रशासनाची साथ मिळत नसल्याची माहिती समोर येत आहे. सभापती पदाचा पदभार स्विकारल्यावर सर्वप्रथम ठेकेदारी पद्धत बंद करा, तसेच जे अधिकारी-कर्मचारी कामचूकारपणा करीत असतील त्यांच्तावर कठोर कारवाई करावी असेही त्यांनी सुचवले होते. तसा प्रस्ताव ठेवण्यात आला होता, मात्र त्यास केराची टोपली दाखवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.भरती प्रक्रिया देखिल थेट करावी जेणेकरुन येथिल युवकांना रोजगाराची संधी मिळेल आणि ठेकेदाराला विशीष्ट कमीशन द्यावे लागणार नाही. सध्यापेक्षा जास्त वेतनावर कामगार कामावर घ्या, तसेच चांगले झ्र कुशल कामगार असतील त्यांचा योग्य सन्मान करावा. जे आधीपासूनच कुशल आहेत त्यांनाही बढती द्यावी, त्यांचा आत्मविश्वास वाढवावा असेही प्रशासनाला सुचवल्याचे ते म्हणाले. ज्या नव्या बसेस आल्या आहेत त्या आगारात उभ्या ठेवण्यात प्रशासनासह सत्ताधा-यांची नामुष्की असून चालक नाहीत हे कारण तांत्रिक दृष्टया योग्य असले तरीही प्रवाशांना सुविधा देण्यात प्रशासन-सत्ताधारी कमी पडत असल्याची टिका सर्वसामान्यांमधून उमटत असल्याचे ते म्हणाले. परिवहनच्या बस सुविधेची चांगली देखभाल होत नाही, याला जबाबदार कोण? त्यांच्यावर काय कारवाइ होणार असा सवालही विचारण्यात येत असून त्याला उत्तर देतांना प्रशासनासह सभापती म्हणुन नाकी नऊ येत असल्याचे सांगण्यात आले. आर्थिक डबघाइची शक्यता नसून पारदर्शक कारभार होणे अत्यावश्यक असल्याचे ते म्हणाले. -परिवहच्या तिकिट यंत्रणेमधील एका यंत्रात तांत्रिक बिघाड असल्याचे जून मधील सभेत एका सदस्याने प्रशासनाच्या नीदर्शनास आणले होते. एका प्रवाशाने आठ रुपये मोजले असता त्यास ६ रुपयाचे तिकिट अदा करण्यात आले होते, अशी तक्रार संबंधित सदस्याने केली होती. ज्या यंत्रात तांत्रिक फॉल्ट होता तो तात्काळ दुरुस्त करण्यात आला असून आता अशी समस्या उद्भवणार नसल्याचे स्पष्टीकरण परिवहन प्रशासनाकडून देण्यात आल्याचे भोसले म्हणाले. -परिवहनमधून साधारणत: प्रतीदिन ४० हजार प्रबासी प्रवास करीत असल्याचे सांगण्यात आले. माणसी एक तिकिट अशा पद्धतीने ४० हजार तिकिटांचे वाटप ठिकठिकाणच्या यंत्रांमधून करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. ठेकेदारी पद्धत बंद होणे आवश्यकच आहे. परंतू त्यास प्रशासनाची साथ हवी. केडीएमटीत ती मिळत नसल्याचे दिसून येत आहे. आता नव्याने येणा-या १८५ बसेस चालवण्यासाठी थेट भरतीची गरज असून स्थानिकांना रोजगार मिळायला हवा. यासाठी परिवहनचे सर्व सदस्यांचे एकमत असून प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष आहे.- दिपक भोसले, सदस्य केडीएमटीठेकेदारी पद्धत बंद करा, स्वत:ची यंत्रणा सक्षम आहे. ठेकेदाराची माणसे कितपत मन लावून कामे करतात हे केडीएमटीच्या सद्द:स्थितीच्या खिळखिळया अवस्थेवरुन दिसतेच आहे. त्यामुळे जे ड्रायव्हर-कंडक्टर अनेक वर्षे आहेत त्यांना अन्य कामांची जबादारीही देणे आवश्यक आहे. - राजेश कदम, माजी सदस्य केडीएमटी
ठेकेदारी हवीच कशाला?
By admin | Updated: June 20, 2015 23:01 IST