Join us  

मुंबईत कोण ठरणार किंगमेकर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 6:52 AM

उत्सुकता शिगेला; युतीचे खासदार विजयी होणार की आघाडीची होणार वापसी याचा आज निकाल

मुंबई : युती किंवा आघाडीला एकतर्फी कौल देण्याची गेल्या दोन निवडणुकांतील मुंबईकरांची परंपरा यंदाही कायम राहणार की खंडित होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रचारादरम्यान मंबईतील सहाही मतदारसंघांत युती विरुद्ध आघाडी अशी थेट लढत असल्याचे चित्र होते. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि मनसेच्या भूमिकेचा निकालावर कितपत परिणाम होणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. मुंबईत युतीचे खासदार विजयी ठरणार की आघाडीची वापसी होणार, याचा आज निर्णय होण्याची शक्यता आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहाही जागांवर युतीचे उमेदवार विजयी झाले होते. यापैकी भाजपा आणि शिवसेनेच्या वाट्याला प्रत्येकी तीन जागा आल्या होत्या. किरीट सोमय्यांचा अपवाद वगळता सर्वच जागांवर युतीने विद्यमान खासदारांनाच संधी दिली होती. उत्तर पूर्व मुंबईत सोमय्यांच्या जागी मनोज कोटक यांना भाजपने मैदानात उतरविले होते. आघाडीने उत्तर मुंबईत ऊर्मिला मातोंडकर यांच्या रूपाने नवा चेहरा दिला होता. दिवंगत गुरुदास कामतांच्या जागेवर संजय निरुपम उभे होते. तर, उर्वरित चारही ठिकाणी जुनेच चेहरे रिंगणात होते. युती आणि आघाडीच्या उमेदवारांसह एकूण ११६ उमेदवारांचा आज फैसला होणार आहे.

मनसेने यंदा प्रत्यक्ष निवडणुकीतून माघार घेत केवळ भाजपविरोधात प्रचार केला. मनसेची ही रणनीती यशस्वी ठरणार का? २००९ प्रमाणे यंदाच्या निकालात मनसे प्रभाव पडणार का? याचे उत्तर आज मिळणार आहे. यावरच राज ठाकरे यांच्या राजकारणाची पुढची दिशा ठरणार आहे. तर, वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांच्या प्रयोगाला मुंबईकर कितपत प्रतिसाद देतात, तेही आजच्या निकालात स्पष्ट होणार आहे.उत्तर मुंबईकाँग्रेसने ऐनवेळी अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देत येथील लढतीत चुरस निर्माण केली. भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात ऊर्मिलाने प्रचारादरम्यान चांगलीच लढत दिली. त्यामुळे २०१४ प्रमाणे गोपाळ शेट्टी साडेचार लाखांचे मताधिक्य घेणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

उत्तर पश्चिम मुंबईशिवसेनेचे गजानन कीर्तिकर विरुद्ध काँग्रेसचे संजय निरुपम यांच्यात येथे लढत आहे. कीर्तिकरांना स्थानिक भाजप नेत्यांशी जुळवून घेण्यासाठी कसरत करावी लागली होती. तर, निरुपम यांना शेवटपर्यंत एकाकीच झुंज द्यावी लागल्याचे चित्र आहे.

उत्तर पूर्व मुंबई

विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांचा पत्ता कट करत भाजपने ऐनवेळी मनोज कोटक यांना उमेदवारी दिल्याने स्थानिक शिवसैनिकांचा राग काही प्रमाणात मावळला. मात्र, येथील मराठी मते भाजपसोबत राहणार की राष्ट्रवादीच्या संजय दिना पाटील यांच्याकडे वळणार यावर येथील बरेचसे गणित अवलंबून आहे.

उत्तर मुंबईकाँग्रेसने ऐनवेळी अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देत येथील लढतीत चुरस निर्माण केली. भाजपचा गड मानल्या जाणाºया या मतदारसंघात विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात ऊर्मिलाने प्रचारादरम्यान चांगलीच लढत दिली. त्यामुळे २०१४ प्रमाणे गोपाळ शेट्टी साडेचार लाखांचे मताधिक्य घेणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

उत्तर पश्चिम मुंबईशिवसेनेचे गजानन कीर्तिकर विरुद्ध काँग्रेसचे संजय निरुपम यांच्यात येथे लढत आहे. कीर्तिकरांना स्थानिक भाजप नेत्यांशी जुळवून घेण्यासाठी कसरत करावी लागली होती. तर, निरुपम यांना शेवटपर्यंत एकाकीच झुंज द्यावी लागल्याचे चित्र आहे.दक्षिण मध्य मुंबईमुंबईतील अगदीच अटीतटीची लढत या मतदारसंघात पाहायला मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. शिवसेनेच्याराहुल शेवाळे यांच्याविरोधात काँग्रेसकडून एकनाथ गायकवाड रिंगणात आहेत.दक्षिण मुंबईमुकेश अंबानींसारख्या उद्योजकाने काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांना दिलेला पाठिंब्यामुळे येथील लढतीची देशभर चर्चा झाली. देवरा विजयी होणार की पुन्हा एकदा अरविंद सावंतांना मतदारांची पसंती मिळणार ते आजच्या निकालाने स्पष्ट होणार आहे.