महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येदीयुरप्पा की फडणवीस? बाळासाहेब थोरात यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 06:17 AM2019-08-14T06:17:05+5:302019-08-14T06:18:35+5:30

पूरग्रस्त महाराष्ट्राला साहाय्य करण्याबाबत केंद्र सरकारची अनास्था उघड झाली आहे. विरोधकांच्या टीकेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कर्नाटकसह राज्यातील सांगली, सातारा, कोल्हापूरचीही हवाई पाहणी केली.

Who is Chief Minister of Maharashtra, Yeddyurappa or Fadnavis? The question of Balasaheb Thorat | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येदीयुरप्पा की फडणवीस? बाळासाहेब थोरात यांचा सवाल

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येदीयुरप्पा की फडणवीस? बाळासाहेब थोरात यांचा सवाल

Next

मुंबई : पूरग्रस्त महाराष्ट्राला साहाय्य करण्याबाबत केंद्र सरकारची अनास्था उघड झाली आहे. विरोधकांच्या टीकेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कर्नाटकसह राज्यातील सांगली, सातारा, कोल्हापूरचीही हवाई पाहणी केली. मात्र, इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे की, महाराष्ट्रातील पाहणीवेळी शाह यांच्यासोबत कर्नाटकचे मुख्यमंत्री येदीयुरप्पा होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा एकही मंत्री यावेळी नव्हता. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येदीयुरप्पा आहेत की, देवेंद्र फडणवीस याचा खुलासा व्हायला हवा, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.

मंगळवारी, टिळक भवन येथे काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर, पत्रकारांशी बोलताना थोरात म्हणाले की, केंद्र, राज्य सरकारने महाराष्ट्रातील पुराकडे गांभीर्याने पाहिले नाही. अद्याप केंद्राने राज्याला मदत दिली नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर महाराष्ट्रातील गंभीर परिस्थितीवर साधे टिष्ट्वटही केलेले नाही. लाखो लोक बेघर झाले, पशुधन नष्ट झाले. व्यवसाय, शेती बुडाली. या पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, त्यांना नवे कर्ज द्यावे या व इतर मागण्यांसाठी बुधवारी काँग्रेसचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचेही थोरात म्हणाले.

पूरग्रस्त भागात स्वच्छता मोहीम
हळूहळू पुराचे पाणी ओसरू लागले आहे, पण स्वच्छता आणि आरोग्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यासाठी सरकारने पावले उचलण्याची गरज आहे. सरकारची मदत सर्वांपर्यंत पोहोचत नसल्याने, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते १६ आॅगस्ट ते २६ आॅगस्ट या कालावधीत पूरग्रस्त भागात स्वच्छता मोहीम राबविणार आहेत, तसेच लोकांना मदत करणार आहेत.

Web Title: Who is Chief Minister of Maharashtra, Yeddyurappa or Fadnavis? The question of Balasaheb Thorat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.