Join us  

माझी मुलगी कुठेय? हतबल वडिलांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 6:24 AM

घामाघूम झालेला चेहरा, थकलेले शरीर, पोटच्या लेकीच्या काळजीने चिंताग्रस्त झालेला चेहरा.

- स्नेहा मोरे मुंबई : घामाघूम झालेला चेहरा, थकलेले शरीर, पोटच्या लेकीच्या काळजीने चिंताग्रस्त झालेला चेहरा... अन् थरथरत्या पावलांनी ७५ वर्षीय गृहस्थ ‘माझी मुलगी कुठेय?’ असा सवाल ये-जा करणाऱ्या पोलिसांना विचारत होते. शुक्रवारी टीव्हीवर भायखळा कारागृहातील कैद्यांना बाधा झाल्याची बातमी पाहिली. त्यानंतर, अँटॉप हिल येथे राहणाºया या ७५ वर्षीय गृहस्थाने पत्नीसह लगेचच जे. जे. रुग्णालय गाठले अन् मग कित्येक तास मुलीच्या शोधात वॉर्डमध्ये ते भावनावश होऊन हिंडत होते.अँटॉप हिल येथील हे दाम्पत्य. थरथरत्या पावलांनी जे. जे. रुग्णालय पिंजून काढत, हे गृहस्थ सकाळी साडेदहाच्या सुमारास रुग्णालयात दाखल झाले. मात्र, शुक्रवारी दुपारी ३ वाजल्यानंतरही मुलीविषयी कुठलीच माहिती मिळत नसल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आपली ४० वर्षांची मुलगी गेल्या दोन महिन्यांपासून भायखळा कारागृहात आहे. कलम २०३ अंतर्गत तिच्यावर दोष असल्याचा संशय असून हे प्रकरण अंडर ट्रायल आहे. येत्या दोन दिवसांत तिचा खटला सुरू होणार होता. मात्र, सकाळी बाधा झाल्याची बातमी कळली अन् काळजात धस्स झाले. दुपार उलटूनही मुलीविषयी कुणीच माहिती देत नाही. गेटवरील पोलीस आत जाऊ देत नाहीत. रुग्णालय प्रशासनकापैकी कुणाकडूनच् काही माहिती मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले.वडील पुढे म्हणाले की, मुलीसोबत भायखळा कारागृहात सोमवारी अखेरची भेट झाली. या भेटीत मुलीने तिच्या दोन मुलांविषयी चौकशी केली होती, तसेच आमच्या औषध आणि प्रकृतीविषयी विचारपूस केली. आता तिला कुठे शोधायचे हेच कळत नाही. ती बरी असेल ना, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.>लेकीला पाहायचे आहे‘आमचे वय झाले आहे, खूप हिंडू-फिरू शकत नाही. पतीला सांभाळू की लेकीला, असा हतबल सवाल ‘त्या’ मुलीची आई करत होती. जे. जे. रुग्णालयात चार तास उलटूनही मुलीचा पत्ता लागला नव्हता. त्यात पतीची तब्येत बरी नव्हती. त्यामुळे अशा दोन्ही काळजीने काही सुचत नाहीये. मला फक्त लेकीला पाहायचे आहे,’ एवढेच तिची आई दाटलेल्या स्वरात सांगत होती.>ढिसाळ कारभारमुलीचे नाव विचारले असता, डॉक्टर माहिती देत नाहीत. एका वॉर्डमध्ये तिचे नाव नाही. दुसºया वॉर्डमधील डॉक्टरांकडे कुठलीच यादी नाही, रुग्णालय प्रशासनाचा कारभार ढिसाळ असल्याची तक्रार या दाम्पत्याने केली.