Join us  

महिला स्वतंत्र तिकीट खिडक्या कधी?

By admin | Published: November 11, 2014 11:09 PM

गतवर्षी मध्य रेल्वेने सीएसटी स्थानकात महिलांसाठी स्वतंत्र तिकीट खिडकीचा 13 नोव्हेंबर रोजी शुभारंभ केला होता. त्या निर्णयाचे महिला प्रवाशांकडून स्वागत करण्यात आले.

अनिकेत घमंडी ल्ल ठाणो
डोंबिवली : गतवर्षी मध्य रेल्वेने सीएसटी स्थानकात महिलांसाठी स्वतंत्र तिकीट खिडकीचा 13 नोव्हेंबर रोजी शुभारंभ केला होता. त्या निर्णयाचे महिला प्रवाशांकडून स्वागत करण्यात आले. वर्षभरापासून ही सुविधा गर्दीच्या सर्वच स्थानकांत असावी, असा प्रस्ताव महिला प्रवाशांच्या प्रतिनिधींनी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मुकेश निगम यांच्याकडे मांडला होता. महिनोन्महिने हा प्रस्ताव धूळखात पडून राहिला आहे. आमच्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवल्याची भावना महिला प्रवाशांमध्ये असून याबाबत रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
सीएसटी, दादर आणि ठाणो येथे ही सुविधा असून त्यास चांगला प्रतिसाद मिळाला असल्याने आणखी किती दिवस या खिडक्या प्रायोगिक तत्त्वावर ठेवण्यात येणार, असा सवाल विचारण्यात येत असून अन्य ठिकाणच्या या प्रस्तावाचे काय, असा नाराजीचा सूर महिलांमध्ये आहे. उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेच्या उपाध्यक्षा लता अरगडे (डोंबिवली), नाङिामा सय्यद (मुंब्रा), रेखा जाधव (अंबरनाथ), अनिता झोपे (आसनगाव) आदींनी याबाबत रेल्वे प्रशासनाचा निषेध व्यक्त करून अधिका:यांना काहीही बदल करायचेच नाही का, अशी बोचरी टीका केली.
 महिला तिकीट खिडकीच्या योजनेला प्रतिसाद चांगला आहे. त्यानुसार, मनुष्यबळासह अन्य तांत्रिक बाबी तपासण्याचे काम सुरू आहे. तसेच अन्य कुठे ही सुविधा द्यावी, यासंदर्भात पाहणी सुरू असून त्या कधी सुरू करता येतील, याचा अद्याप काहीही विचार झाला नसल्याचे स्पष्टीकरण म.रे.च्या जनसंपर्क विभागाने दिले.
 
4कर्जत, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, टिटवाळा, आसनगाव, कसारा,  शहाड, डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा, ठाणो, मुलुंड, कांजुरमार्ग, घाटकोपर, कुर्ला, दादर, सायन; लोअर परेल, मशीद बंदर या मुख्य मार्गासह आणि हार्बर मार्गावरील सीएसटी ते पनवेलसह घणसोली, कोपरखैरणो, तुर्भे, सानपाडा, वाशी तसेच नेरूळ.