जेव्हा सांताक्लॉजकडून ‘आदेश’ येतो...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 01:40 AM2019-12-30T01:40:31+5:302019-12-30T01:40:50+5:30

कामाचा मोबदला म्हणून मिळणारे पैसे रखडण्याच्या घटना नाटक, चित्रपट किंवा मालिकाविश्वात अधूनमधून घडत असतात.

When the 'command' comes from Santa Claus ... | जेव्हा सांताक्लॉजकडून ‘आदेश’ येतो...

जेव्हा सांताक्लॉजकडून ‘आदेश’ येतो...

Next

- राज चिंचणकर 

मुंबई : कामाचा मोबदला म्हणून मिळणारे पैसे रखडण्याच्या घटना नाटक, चित्रपट किंवा मालिकाविश्वात अधूनमधून घडत असतात. एका दूरचित्रवाणी वाहिनीवरील एका मालिकेच्या कलाकारांच्या बाबतीतही अशीच एक घटना घडली. या कलाकारांचे पैसे सहा महिने झाले तरी त्यांना मिळाले नव्हते. पण ऐन नाताळच्या मुहूर्तावर एका सांताक्लॉजकडून ‘आदेश’ सुटला आणि या कलाकारांचे पैसे त्यांच्या हाती पडले. हा सांता दुसरा तिसरा कुणी नसून आदेश बांदेकर होत.

मराठीतील आघाडीच्या काही कलाकारांना हा अनुभव आला आणि त्यांनी तो सोशल मीडियातून सर्वत्र पोहोचवला. अरुण नलावडे, सविता प्रभुणे, रोहन गुर्जर आदी कलाकारांनी काम केलेल्या मालिकेचे पैसे त्यांना मिळाले नव्हते.

वारंवार मागणी करूनही हे पैसे जमा होत नव्हते. यावर तोडगा काढायचाच, या हेतूने कलाकारांनी एकजूट केली होती. मात्र तरीही, त्यांच्या पदरी यश येत नव्हते. शेवटी, त्यांनी आदेश बांदेकर यांच्याशी संपर्क साधला आणि आदेश बांदेकर यांनी यात लक्ष घालत ऐन नाताळच्या दिवसांत या कलाकारांना त्यांचे पैसे मिळवून दिले. साहजिकच, या कलाकारांसाठी यंदाचा नाताळ अधिक आनंदाचा ठरला आहे.

Web Title: When the 'command' comes from Santa Claus ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.