Join us  

अभिनेता कमाल खानला विमानतळावर ताब्यात घेतले तेव्हा...; २०१६ चे प्रकरण

By मनोज गडनीस | Published: December 26, 2023 9:51 PM

काही तासांनी सोडून दिले...

मनोज गडनीस, मुंबई - अभिनेता कमाल खान परदेशात चित्रीकरणासाठी जाण्यासाठी मुंबई विमानतळावर दाखल झाला खरा. पण इमिग्रेशन विभागात त्याने प्रवेश केल्यानंतर त्याच्या विरोधात लूक आऊट नोटिस असल्याच्या मुद्यावरून अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले व त्यानंतर त्याला वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये हजर करण्यात आले.

पोलिसांनी त्याला नोटिस बजावात मग त्याला सोडून देण्यात आले. २५ डिसेंबरच्या रात्री ही घटना घडली आहे. अभिनेता कमाल खान याने २०१६ मध्ये बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्री व मॉडेल्स यांच्याविरोधात सोशल मीडियावर अश्लील भाषेत पोस्ट केल्या होत्या. या प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. तसेच, वर्सोवा पोलिसांनी त्याच्या विरोधात लूक आऊट नोटिस जारी केली होती. ही नोटिस इमिग्रेशनच्या रेकॉर्डवर देखील होती. त्यामुळे ज्यावेळी तो इमिग्रेशन विभागात दाखल झाला व त्याच्या कागदपत्रांची पडताळणी झाली त्यावेळी त्याच्या विरोधात लूक आऊट नोटिस जारी असल्याचे अधिकाऱ्यांना समजले व त्यांनी त्याला ताब्यात घेतले होते.

टॅग्स :मुंबई