मुंबई : मुंबई विद्यापीठातील प्राध्यापक, प्राचार्य, संचालक आणि महिला विद्याथ्र्याच्या लहान मुलांचा सांभाळ करण्यासाठी विद्यापीठाने 2011 पासून विद्यापीठाच्या कालिना संकुलात ‘चाइल्ड डे केअर सेंटर’ उभारण्यात आले आहे. परंतु त्यासाठी लागणारा पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने या सेंटरमध्ये मुलांचा सांभाळ होण्याऐवजी प्राध्यापक आणि कर्मचा:यांच्या मुलांचे लगA समारंभ पार पडत असल्याचे समोर आले आहे.
मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलातील जे. पी. नाईक भवन इमारतीच्या मागे असलेल्या प्रशस्त इमारतीत चाइल्ड डे केअर सेंटरची स्थापना 2क्11 मध्ये करण्यात आली आहे. या सेंटरमध्ये प्राध्यापक, कर्मचा:यांचे शिशू व मुलांच्या देखभालीसाठी विविध प्रकारचे साहित्य, खेळणी अशा सुविधांसाठी 2क् लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात विद्यापीठाकडून आतार्पयत हा निधीच उपलब्ध करून न दिल्याने हे सेंटर अडगळीत पडले आहे.
या सेंटरला पुरेसा निधी उपलब्ध न झाल्याने हे सेंटर अद्याप सुरू झालेले नाही. दोन मजली इमारत असलेल्या या सेंटरचा अजूनही योग्य कामासाठी वापर होत नसून विद्यापीठाने तातडीने हे सेंटर सुरू करावे, अशी मागणी मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य संजय वैराळ यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
भलत्याच कार्यासाठी वापर
विद्यापीठाने बालकांच्या काळजीपोटी चाइल्ड डे केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला. मात्र, याठिकाणी गेल्या काही वर्षापासून विद्यापीठ कर्मचा:यांच्या लग्न समारंभाचे कार्यक्रम पार आहेत.