Join us  

अन्न वाया न घालविण्याची शपथ घ्यायला हवी- डॉ. शरद काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2020 1:21 AM

१९ वी वि.गो. कुलकर्णी स्मारक आॅनलाइन व्याख्यानमाला

मुंबई : देशावर आलेल्या संकटामुळे आता आपण कठीण काळातून जात आहोत. मात्र आपल्याला स्वत:च्या जबाबदाऱ्या विसरून चालणार नाहीत. रोजच्या जगण्यात आपण अनेक गोष्टी कचºयात टाकून पर्यावरणावरील भार वाढवत असतो. यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. पर्यावरण वाचवायचे असल्यास आपण वेस्ट (कचरा) हा शब्द आपल्या शब्दकोशातून काढून टाकायला हवा. त्याचप्रमाणे आपल्या जेवणाच्या ताटातील अन्नाचा एकही कण वाया न घालविण्याची आपण शपथ घ्यायला हवी, असे मत प्रख्यात वैज्ञानिक डॉक्टर सुरेश काळे यांनी व्यक्त केले.

होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन आणि टाटा इन्स्टिट्यूट आॅफ फंडामेंटल रिसर्च यांच्यातर्फे आयोजित १९व्या वि़ गो. कुलकर्णी स्मारक व्याख्यानमालेत ते बोलत होते. ‘पर्यावरण टिकविण्यासाठी आपली सामूहिक जबाबदारी’ या विषयावर सोमवारी हे आॅनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

यावेळी ते म्हणाले की, अहमदनगर येथे शाळेत शिकताना शिक्षणासोबतच विविध गोष्टी शिकण्यास मिळाल्या. १ हजार लीटर क्षमता असणाºया पाण्याच्या टाकीमध्ये १२० लीटर प्रति मिनीट वेगाने पाणी भरत आहे. त्याच टाकीला लागलेल्या गळतीमधून २० लीटर प्रति मिनीट वेगाने पाण्याची गळती होत असते. तर टाकी भरण्यास किती वेळ लागेल, असा प्रश्न एकदा गणिताच्या शिक्षकांनी वर्गात विचारला होता, त्यावेळेस मी त्या शिक्षकांना प्रतिप्रश्न केला की, त्या पाण्याच्या टाकीला लागलेली गळती कोणी दुरुस्त का केली नाही? भारतात अनेक कार्यालये, घरांमध्ये एसीचे प्रमाण वाढले आहे.

या एसीच्या युनिटमधून सतत पाणी बाहेर सांडत असते. हे पाणी वापरात न आणल्याने वाया जाते. आपल्या घरातून कमीत कमी कचरा कचरापेटीत जाईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी घरातील कचºयाची घरातच विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. अनेक जण वास येईल या भीतीने घरातील कचºयाची विल्हेवाट लावण्यास टाळाटाळ करतात, मात्र नारळाच्या शेंड्यांचा वापर करून कचºयाची विल्हेवाट लावता येते़

यासंदर्भात २ँं१ं‘िं’ी@ॅें्र’.ूङ्मे या ईमेलद्वारे संपर्क साधल्यास मी आपल्याला मार्गदर्शन करू शकतो. पर्यावरणाचा समतोल राखायचा असल्यास कचरा निर्माण करू नका, घंटागाडीची वाट पाहू नका व बाहेरील प्लास्टिक घरात आणू नका. यावेळी शरद काळे यांनी उपस्थित श्रोत्यांच्या प्रश्नांची उत्तरेही दिली.