Join us  

‘हमे बम नही, शांती चाहिए’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 2:41 AM

‘परमाणु बम नही; रोजी-रोटी, शिक्षा चाहिए’, ‘मानवता करे पुकार, अणुमुक्त चाहिये समाज’ अशा घोषणा देत, आझाद मैदान ते हुतात्मा चौक येथे शांतता रॅली सोमवारी काढण्यात आली.

मुंबई : ‘परमाणु बम नही; रोजी-रोटी, शिक्षा चाहिए’, ‘मानवता करे पुकार, अणुमुक्त चाहिये समाज’ अशा घोषणा देत, आझाद मैदान ते हुतात्मा चौक येथे शांतता रॅली सोमवारी काढण्यात आली. हिरोशिमा आणि नागासाकी येथे ६ आॅगस्ट १९४५ रोजी अण्वस्त्र बॉम्बहल्ला करण्यात आला होता. माणुसकीला काळिमा फासणारी ही गोष्ट होती. याच पार्श्वभूमीवर अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी सर्वाेदय मंडळातर्फे रॅली काढण्यात आली. मुंबई विद्यापीठ आणि एसएनडीटी विद्यापीठ यांच्याशी संलग्न असलेल्या ३८ महाविद्यालयांतील एनएसएस युनिटने यात सहभाग घेतला होता.‘बम नही शांती चाहिए’ अशा घोषणा देत, विद्यार्थ्यांनी युद्ध नको, शांतता पाहिजे आहे, असे याद्वारे सांगितले. याप्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार, एसएनडीटीच्या एनएसएस विभागाचे प्रमुख नितीन प्रभुतेंडुलकर, शेतकरी संघटनेचे नेते रघू पाटील, सामाजिक नेत्या वर्षा विद्या विलास उपस्थित होते. ‘परमाणु बम नही; रोजी-रोटी, शिक्षा चाहिए’, ‘मानवता करे पुकार, अणुमुक्त चाहिये समाज’ अशा घोषणा देत रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी सांगितले की, आम्हाला युद्धाची गरज नाही, शांतीची आवश्यकता आहे. जपान येथील हिरोशिमा आणि नागासाकीत झालेल्या अण्वस्त्र बॉम्बहल्ल्याला ७३ वर्षे पूर्ण झाली. या हल्ल्याचे प्रायश्चित्त करण्यासाठी हुतात्मा चौक येथे हे सारे जमले होते. जगभरात शांती प्रस्थापित होण्यासाठी परमाणू आणि हत्यारे नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत राहू, अशी शपथ या वेळी घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी युद्धाविरोधी आणि शांतता प्रेरक फलक हातात घेतले होते. काही विद्यार्थ्यांनी ‘नो वॉर, नो बॉम्ब’ असे चित्र हातावर काढले होते.

टॅग्स :हिरोशिमा आणि नागासाकी अणुबॉम्ब