Join us  

पाणथळींना ‘रामसार’ यादीची प्रतीक्षा, राजू कसंबे यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 7:27 AM

महाराष्टÑात अनेक पाणथळ जागा आहेत, जिथे किमान २० हजार पक्षी सातत्याने दिसून येतात. त्यांचा अभ्यास करून ती यादी शासनाकडे द्यावी लागते. त्यानंतर रामसार ठरावानुसार त्याची पाहणी केल्यावर त्या जागेला त्या यादीत स्थान मिळते.

ठाणे : महाराष्टÑात अनेक पाणथळ जागा आहेत, जिथे किमान २० हजार पक्षी सातत्याने दिसून येतात. त्यांचा अभ्यास करून ती यादी शासनाकडे द्यावी लागते. त्यानंतर रामसार ठरावानुसार त्याची पाहणी केल्यावर त्या जागेला त्या यादीत स्थान मिळते. मात्र आपल्याकडील अनेक पाणथळ जागांचे योग्य संवर्धनच झालेले नाही. त्याकडे शासनाचे दुर्लक्ष झालेले असून, आता यासाठी पक्षीमित्र-संघटनांनी एकत्र येऊन शासनाकडे पत्र देण्याची आणि त्यासाठी पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे मत बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे शास्त्रज्ञ, ज्येष्ठ पक्षिमित्र डॉ. राजू कसंबे यांनी व्यक्त केले.महाराष्टÑ पक्षिमित्र संघटना आणि होपर नेचर ट्रस्ट आयोजित ३१ वे महाराष्टÑ पक्षीमित्र संमेलन गडकरी रंगायतन येथे आयोजिले आहे. या संमेलनाच्या दुसºया दिवशी महाराष्टÑाचे रामसार आणि त्यांच्या संवर्धनाचे महत्त्व या विषयावर सत्र रंगले होते. त्यावेळी कसंबे बोलत होते.भारतातील केवळ २६ जागा रामसार यादीत आहेत. नांदूर-मध्यमेश्वर, जायकवाडी, लोणार, उजनी, ठाणे खाडी अशा सुमारे ७ पाणथळ जागा रामसार यादीत याव्या अशी मागणी करण्यात आली आहे. त्यापैकी एका नावाला अनुमोदनही मिळाले आहे. यातील ठाणे खाडीसह एखाद दुसºया पाणथळ जागेचे संवर्धन झालेले आहे. मात्र इतर जागांचे योग्य संरक्षण करण्यात आलेले नाही. किमान २० हजार पक्षी तेथे सातत्याने मिळावेत इतकी प्राथमिक अट त्यासाठी आहे. देशातील तर २०० पेक्षाअधिक जागा त्या यादीत बसण्यायोग्य आहेत. त्याचा अभ्यास करण्याची आणि त्या पाणथळ जागांचे संवर्धन करण्याची गरज आहे. एखादी पाणथळ जागा रामसार साईटस् म्हणून घोषित झाल्यावर त्या ठिकाणी कोणतेही बांधकाम करता येतनाही, अशी माहिती डॉ. कसंबे यांनी यावेळी दिली.सारस पक्ष्याच्या संवर्धनाबाबत दिली माहितीयाच सत्रादरम्यान गोंदिया जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक मुकुंद धुर्वे यांनी जिल्ह्यातील सारस आणि त्यांच्या संवर्धनासाठीची मोहिम याविषयी माहिती दिली.मिलिंद गाथाडे यांनी पाय किंवा पंख तुटलेल्या पक्ष्यांवर कसे उपचार केले जातात याची माहिती देऊन पाय तुटलेल्या करकोच्यावर आधारीत चलचित्रफित दाखविली.तर पक्षीमित्र प्रेमसागर मेस्त्री यांनी बर्ड रेस्क्यू या विषयावर माहिती दिली. तसेच पक्ष्यांशी संबंधित इतर काही माहिती पक्षीमित्रांनी दिली.विरोधाची कारणे पटवून दिल्यास शासन नमतेठाणे : निसर्गाची हानी करणाºया प्रकल्पांना विरोध करताना पक्षीप्रेमींकडे त्या प्रकल्पांची परिपूर्ण माहिती असावी. विरोध करण्यामागची शास्त्रीय कारणे त्यांनी शासनाला पटवून दिली तर त्या विरोधाची शासन निश्चित दखल घेईल, असे प्रतिपादन बीएनएचएसचे संचालक डॉ. दीपक आपटे यांनी केले.होप नेचर ट्रस्ट आणि महाराष्ट्र पक्षिमित्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गडकरी रंगायतन येथे आयोजित ३१ व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाच्या दुसºया दिवसाच्या पहिल्या सत्राची सुरूवात डॉ. आपटे यांच्या सादरीकरणाने झाली. त्यांनी ‘अमूर फाल्कन’ या ससाणाच्या जातीच्या संवर्धनाविषयी सादरीकरण केले. नागालँड येथे अमूर फाल्कनची केली जाणारी शिकार आणि त्यानंतर स्थानिकांमध्ये करण्यात आलेल्या जागृतीमुळे या पक्ष्यांची थांबलेली शिकार याची माहिती त्यांनी उदाहरणासह दिली. ते म्हणाले की, अमूर फाल्कन हा पक्षी दक्षिण आफ्रिकेपासून मंगोलियापर्यंत स्थलांतर करतो आणि तेथून तो परत जातो.नागालँडमधील डोयँग नावाच्या तलावावर ते थांबतात. तिथेच या पक्ष्याची शिकार केली जात होती. तीन महिन्यांत हजारो पक्षी मारले जात होते. मात्र पक्षीप्रेमी संस्थांनीतेथील स्थानिकांना विश्वासातघेऊन या पक्ष्याची शिकारथांबवली. २०१३ पासून तिथे एकही शिकार करण्यात आलेली नाही. शिकार करुन जेवढे उत्पन्न मिळते त्यापेक्षा जास्त इको टुरिझममधून मिळते. शिकार करणे हे तात्पुरते साधन आहे पण इको टुरिझम हे कायमस्वरुपी साधन होऊ शकते हे त्यांना पटले आणि ही शिकार थांबविण्यात आली. हा पक्षी संवर्धनातील यशस्वी प्रकल्प समजला जातो, असे डॉ. आपटे म्हणाले.‘विंडो बर्डिंग’ या विषयावर सीमा राजशिर्के यांनी सादरीकरण केले. आपल्या घरातील खिडकीतून त्यांनी टिपलेल्या पक्ष्यांची छायाचित्रे, त्यांची माहिती, स्वभाव, त्यांची नावे याचे सादरीकरण त्यांनी केले. रेड हंटेड बुलबुल, शिकरा, अ‍ॅलेक्झांडर, ड्रॉम्बो, हळद्या, सनबर्ड, चातक पक्षी, पर्पल मोर अशा पक्ष्यांबद्दल तसेच, काही पक्ष्यांना त्यांनी ठेवलेल्या नावांच्या गमतीजमतीही त्यांनी सांगितल्या.ठाण्यात आठ ठिकाणी होते गणनाठाणे शहरांत आठ ठिकाणी गणना केली जाते, आठ गटांनी वेगवेगळ््या ठिकाणी केलेल्या पक्षी गणनेबाबत त्यांनी माहिती दिली. त्यानंतर नेचर कन्झर्वेशन सोसायटी आॅफ नाशिकच्या प्रतिनिधी प्रतीक्षा कोथुळे यांनी तसेच डॉ. सुधाकर कुºहाडे यांनी अहमदनगरमधील पक्षी संवर्धनाबाबत सादरीकरण केले.अहमदनगरमध्ये आढळणाºया पक्ष्यांची संख्या जवळपास १७००च्या आसपास असल्याचे त्यांनी सांगितले. अहमदनगर येथे सुरू झालेल्या ‘चला पक्षी पाहू या’ या स्तुत्य उपक्रमाची माहिती दिली. दररोज १५० लोक पाणपक्षी पाहायला येत असल्याचे कुºहाडे यांनी सांगितले.

टॅग्स :ठाणे