Join us  

भारतीय पर्यटकांना खुणावतेय वॉशिंग्टन , वॉशिंग्टन डीसी बनले ‘नेक्स्ट डेस्टिनेशन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 6:55 AM

जागतिकीकरणाचे वारे वाहू लागल्यानंतर, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील पर्यटन व्यवसाय बहरत चालला आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या दहा वर्षांमध्ये पर्यटकांचा कौल आंतरराष्ट्रीय पर्यटनाकडे झुकत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जागतिकीकरणाचे वारे वाहू लागल्यानंतर, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील पर्यटन व्यवसाय बहरत चालला आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या दहा वर्षांमध्ये पर्यटकांचा कौल आंतरराष्ट्रीय पर्यटनाकडे झुकत आहे. दिल्ली, मुंबई, हैदराबादमधील पर्यटकांचा वॉशिंग्टन डीसीकडे ओढा वाढावा, म्हणून प्रयत्नशील असल्याचे ‘डेस्टिनेशन डीसी’चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी इलिआॅट फर्ग्युसन यांनी दिली. मुंबई भेटीवर असताना इलिआॅट यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.मुंबई, दिल्ली आणि हैदराबादमधील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ‘वॉशिंग्टन डीसी’ सध्या प्रयत्नशील आहे. वॉशिंग्टनच्या पर्यटन दृष्टीकोनाबाबत बोलताना इलिआॅट फर्ग्युसन म्हणाले की, अमेरिका म्हटल्यावर सुरुवातीला डोळ्यासमोर येते ते म्हणजे न्यूयॉर्क. मात्र, आता वॉशिंग्टनही त्यापाठोपाठ पर्यटनस्नेही बनले आहे. त्यात एअर इंडियाने दिल्ली ते वॉशिंग्टन अशी थेट विमान सेवा सुरू केल्यानंतर भारतीयांचा ओढा अधिक वाढत आहे. वॉशिंग्टनमधील विविध महोत्सव, ग्रंथालये, वस्तुसंग्रहालय, नाइट लाइफ, क्रीडा प्रकार अशा अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. वॉशिंग्टनच्या नाइट लाइफची जगभरातील पर्यटकांना भुरळ पडते. ऐतिहासिक महत्त्वाच्या अनेक गोष्टी पर्यटकांना पाहण्यासारख्या आहेत. डिजिटल गॅलरीसह येथील म्युझियम आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. २०१७ या वर्षात आतापर्यंत भारतातील तब्बल एक लाख पर्यटकांनी वॉशिंग्टनला भेट दिलेली आहे. महत्त्वाचे म्हणजे, २०१५च्या तुलनेत हे प्रमाण २५ टक्क्यांनी वाढले आहे. २०१७ मध्ये आतापर्यंत दाखल होत झालेल्या १२पैकी एक पर्यटक भारतातील असल्याचेही त्यांनी नमूद केले. पुढील तीन वर्षांत पर्यटकांची संख्या वाढणार असल्याचा आशावादही त्यांनी व्यक्त केला.राजकारण-पर्यटन यात अंतरअमेरिकेत बराक ओबामा यांचे सरकार जाऊन डोनाल्ड ट्रम्प यांचे सरकार सत्तेवर आले. मात्र, त्याचा पर्यटनावर परिणाम झालेला नसल्याचे फर्ग्युसन यांनी नमूद केले. राजकीय सत्ता ही सत्तास्थानी असते आणि पर्यटन आपल्या जागी. पर्यटनवृद्धीसाठी हातभार लावणारे धोरण नेहमीच देशासाठी उत्तम मानले जाते. थेट मुंबई-वॉशिंग्टन अशा विमान सेवेसाठी तुम्ही प्रयत्नशील आहात का, या प्रश्नावर मात्र ‘हा कॉल आमचा नाही, तर तो एअर इंडियाचा आहे...’ असेह इलिआॅट फर्ग्युसन म्हणाले.

टॅग्स :मुंबई