"Was Balasaheb in the presence Fight for Independence? He had merged with Indira Gandhi"; nilesh rane Attack on Shiv Sena vrd | "स्वातंत्र्यलढ्यात बाळासाहेब होते का?, त्यांनी तर इंदिरा गांधींशी मांडवली केली होती"; शिवसेनेवर प्रहार

"स्वातंत्र्यलढ्यात बाळासाहेब होते का?, त्यांनी तर इंदिरा गांधींशी मांडवली केली होती"; शिवसेनेवर प्रहार

ठळक मुद्देवादग्रस्त विधानांसाठी नेहमीच चर्चेत असणाऱ्या माजी खासदार आणि भाजपा नेते नीलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. आणीबाणीत अटक होऊ नये म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधी यांच्याशी मांडवली केली, अशा भाषेत भाजपाचे नेते निलेश राणे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेबांवर टीका केली आहे. वीर सावरकरांचे स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान होते, स्वातंत्र्य चळवळीत भाजपा किंवा तेव्हाचा ‘संघ’ परिवार कोठे होता?

मुंबईः वादग्रस्त विधानांसाठी नेहमीच चर्चेत असणाऱ्या माजी खासदार आणि भाजपा नेते नीलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. आणीबाणीचा हवाला देत निलेश राणेंनी शिवसेनेवर जोरदार प्रहार केला आहे. आणीबाणीत अटक होऊ नये म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधी यांच्याशी मांडवली केली, अशा भाषेत भाजपाचे नेते निलेश राणे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेबांवर टीका केली आहे. शिवसेनेनं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. भाजपाला वीर सावरकरांचा असलेला पुळका खोटा आहे. वीर सावरकरांचे स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान होते, स्वातंत्र्य चळवळीत भाजपा किंवा तेव्हाचा ‘संघ’ परिवार कोठे होता?, असे प्रश्न सामनातून उपस्थित करण्यात आले होते. त्यालाच आता निलेश राणेंनी राणे शैलीत प्रत्युत्तर दिलं आहे. 

स्व. बाळासाहेब स्वातंत्र्य लढ्यात होते का??? की त्यांच्या अगोदर कोण ठाकरे होते??? अटक होऊ नये म्हणून आणीबाणीत स्व. इंदिरा गांधीजींशी बाळासाहेबांनी मांडवली केली, तो इतिहास लोक विसरलेली नसल्याचं म्हणत त्यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला आहे.