Join us  

कामगार बोनसच्या प्रतीक्षेत, किमान सेवेचे बक्षीस म्हणून बोनस मिळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 2:24 AM

गेल्या महिन्यात मुसळधार पावसातही बेस्टसेवा देणाºया कर्मचा-यांना, यंदाच्या दिवाळीत बोनस हुलकावणीच देण्याची शक्यता आहे. मात्र, किमान त्या बेस्ट सेवेचे बक्षीस म्हणून बोनस मिळावा

मुंबई : गेल्या महिन्यात मुसळधार पावसातही बेस्टसेवा देणाºया कर्मचा-यांना, यंदाच्या दिवाळीत बोनस हुलकावणीच देण्याची शक्यता आहे. मात्र, किमान त्या बेस्ट सेवेचे बक्षीस म्हणून बोनस मिळावा, अशी मागणी कर्मचा-यांकडून होत आहे. आर्थिक संकटात असलेल्याबेस्ट कामगारांचे पगार गेले काही महिने उशिरा होत होते. कामगारांच्या आंदोलनानंतर पगार वेळेवर होऊ लागला.त्यात पालिकेनेही अद्याप आर्थिक मदत दिलेली नाही. त्यामुळे बोनसबाबत बेस्ट प्रशासन अनुकूल नाही. याबाबत बेस्ट समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत चर्चा झाली. मात्र, कर्मचाºयांना दर महिन्याला पगार देणे बेस्टला अवघड झालेले असताना, कर्मचाºयांना बोनस कसा द्यायचा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.२९ आॅगस्ट रोजी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसात बेस्टने प्रवाशांना बेस्टसेवा पुरविली. रेल्वेची सेवा विस्कळीत झालेली असतानाबेस्ट बस रस्त्यावर होेती. त्याचे सर्वच स्तरावर कौतुक झाले. त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून बोनस मिळवून देण्याचा प्रयत्न करणार, असे बेस्ट समिती अध्यक्ष यांनी आश्वासन दिले. बेस्ट उपक्रमात सुमारे ४४ हजार कर्मचारी अधिकारी आहेत. त्यांच्या पगारासाठी दरमहा १२० कोटी, तर बोनससाठी १० कोटींहून अधिक रकमेची तजवीज बेस्टला करावी लागेल, असे बेस्ट समितीकडून सांगण्यात आले.गेल्या १० वर्षांपासून बेस्ट उपक्रमात रोजंदारी कामगार म्हणून काम करणाºया ८३५ कामगारांनी मंगळवारी, ३ आॅक्टोबरला डॉकयार्ड रोड येथील कसारा बंदर मार्गावरील बिजली भवनसमोर धरणे आंदोलनाची हाक दिली आहे. कायम सेवेत घेण्याची कामगारांची प्रमुख मागणी असल्याचे बॉम्बे इलेक्ट्रीक वर्कर्स युनियनने सांगितले.युनियनचे अध्यक्ष विठ्ठल गायकवाड यांनी सांगितले की, केबल टाकणे, रस्त्यावर खड्डे खणणे आणि तत्सम कामे करणाºया ८३५ कामगारांना कोणत्याही प्रकारचे सुरक्षा कवच नाही. त्यांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांपर्यंत पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र साधी चर्चा करण्याचे सौजन्यही सरकारने दाखवलेले नाही. त्यामुळे कामगारांना आंदोलन करावे लागत आहे.