Join us

यूएनमध्ये ‘रायगड कन्ये’चा आवाज

By admin | Updated: October 5, 2014 01:28 IST

‘क्लायमेट चेंज’ अर्थात पर्यावरणीय असमतोलामुळे निर्माण झालेल्या घातक पर्यावरणीय बदलांचा विपरीत परिणाम वेगळ्य़ा प्रकारे व अधिक गंभीरपणो महिलांवर होत असतो.

जयंत धुळप - अलिबाग
‘क्लायमेट चेंज’ अर्थात पर्यावरणीय असमतोलामुळे निर्माण झालेल्या घातक पर्यावरणीय बदलांचा विपरीत परिणाम वेगळ्य़ा प्रकारे व अधिक गंभीरपणो महिलांवर होत असतो. परिणामी पर्यावरण असमतोल या जागतिक समस्येच्या अनुषंगाने संयुक्त राष्ट्र संघाच्या माध्यमातून तयार करण्यात येत असलेल्या जागतिक पर्यावरण आचारसंहितेस अंतिम रूप देन्यात येत आहे. मात्र महिलांच्या दृष्टिकोनातून या संहितेचा विचार होणो आत्यंतिक गरजेचे आहे, अशी भूमिका संयुक्त राष्ट्र संघात रायगडच्या कन्या वैशाली पाटील यांनी मांडली. गेल्या 29 सप्टेंबर रोजी न्यू यॉर्कमध्ये आयोजित संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक महिला परिषदेत त्या उपस्थित होत्या. भारतीय व जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प विरोधी कृती समितीच्या त्या नेत्या असून पर्यावरण, आदिवासी व महिला क्षेत्रतील ज्येष्ठ कार्यकत्र्याही आहेत. 
पर्यावरण आणि माणूस या नात्याशी सातत्य ठेवून, त्याकरिता कार्यरत जगभरातील विविध देशांतील महिलांमधून एकूण महिलांची निवड संयुक्त राष्ट्र संघाने ‘ग्लोबल क्लायमेट अॅम्बॅसिडर’ म्हणून केली असून, त्यामध्ये या क्षेत्रत प्रत्यक्ष कार्यरत महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील वैशालीताई पाटील व नवी दिल्लीतील पर्यावरणतज्ज्ञ श्रीमती वंदना शिवा यांचा समावेश आहे. संयुक्त राष्ट्र संघाची पर्यावरणविषयक आचारसंहिता निश्चित करण्याकरिता गेल्या 23 सप्टेंबर रोजी या  जागतिक परिषदेचे आयोजन केले होते. याच परिषदेच्या निमित्ताने 29 सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्र संघाची जागतिक महिला परिषद देखील झाली. यामध्ये जगभरातील विविध देशांच्या महिला पंतप्रधान व महिला राष्ट्राध्यक्षा यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यात वैशाली पाटील यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.  
 संयुक्त राष्ट्र संघाच्यावतीने गेल्या 29 सप्टेंबर रोजी न्यू यॉर्कमध्ये आयोजित ‘क्लायमेट चेंज’ पर्यावरण परिषदेस जगभारातील विविध 121 देशांचे पंतप्रधान व राष्ट्राध्यक्ष उपस्थित होते. मात्र भारत व चीनचे पंतप्रधान उपस्थित राहिले नव्हते, अशी माहिती वैशाली पाटील यांनी दिली. वैशाली पाटील यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक महिला परिषदेत ‘महिलांवर विपरीत परिणाम करणारा पर्यावरणीय असमतोस’ या विषयावर सादरीकरण केले. या वेळी त्यांच्यासमवेत आफ्रिकेतील चिले देशाच्या राष्ट्राध्यक्षा मिशेल बचलेट या उपस्थित होत्या.
 
च्भारत कार्बन उत्सजर्नाच्या बाबतीत जगात आज तिस:या क्रमांकावर आहे. त्याचे विपरीत परिणाम आता दिसू लागले आहेत. भारतातील उत्तराखंड प्रलय, जम्मू-काश्मिरातील पूरग्रस्तता, सन 2क्क्4 व 2क्क्5 मधील रायगडमधील महाडसह अन्यत्रचे भूस्खलन व पूर, माळीण येथील भूस्खलन याबरोबरच विनाअंदाज कोसळणारा पाऊस या भारतातील नैसर्गिक आपत्तीच्या घटना नैसर्गिक असमतोल दर्शवित असल्याचे वैशाली पाटील यांनी या परिषदेत नमूद केले.
 
पश्चिम घाटातील जैवविविधतेचा :हास
निसर्ग असमतोलाचा सर्वाधिक विपरीत परिणाम आदिवासी, छोटे शेतकरी, मच्छीमार यांच्या बरोबरच गरीब जनतेवर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील जैवविविधतेवर आधारित ज्या लोकांचे जीवनमान अवलंबून आहे, अशा हजारो कुटुंबांवर मोठय़ा प्रमाणात झाला असल्याचाही निष्कर्ष आहे. या निसर्ग असमतोलाचा परिणाम वनौपज, मच्छीमारी, तृणाधान्ये, वनौषधी, वन्यप्राणी व पक्षी यांच्यावर होऊन त्यांचा प्रचंड वेगाने :हास होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण असमतोल परिषदेच्या पाश्र्वभूमीवर जगभरातील विविध देशांतील एक हजार संघटनांनी एकत्र येऊन 21 सप्टेंबर रोजी न्यू यॉर्कमध्ये आयोजित केलेल्या ‘पीपल क्लायमेट रॅली’मध्ये सहभागी भारताचे प्रतिनिधित्व करणा:या वैशाली पाटील.
 
कुटुंब सांभाळणा:या
महिलांवर विपरीत परिणाम
पर्यावर असमतोलाचा विपरीत परिणाम भारतातील सर्वात गरीब व मागास जाती-जमातींच्या उपजीविकेवरच होत असून, भारताप्रमाणोच जगातील ज्या ज्या देशांत, जिथे जिथे खाणी, विनाशकारी प्रकल्प, कोळसा-अणुऊर्जा आधारित वीज प्रकल्प आहेत तिथे तिथे आर्थिकदृष्टय़ा कमकुवत व मागासवर्गीय लोकांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम झाला आहे. 
या सर्व ठिकाणी कुटुंबांचा सांभाळ करणो, त्याचे पोट भरणो ही प्रमुख जबाबदारी महिलांवर अधिक प्रमाणात आहे. आणि म्हणूनच संयुक्त राष्ट्र संघाची पर्यावरणविषयक आचारसंहिता निश्चित करताना ते महिलांच्या दृष्टिकोनातून विचार करून अंतिम करणो गरजेचे असल्याची भूमिका वैशाली पाटील यांनी या वेऴी व्यक्त केली.