Viral vedio : 'घोड्यावर बसून गाढवपणा, आमदाराच्या कृत्यानंतर काय करणार बाबरसेना?'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 09:50 AM2021-10-14T09:50:16+5:302021-10-14T09:51:47+5:30

आमदार नवघरे यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काहींना या घटनेचा तीव्र शब्दात विरोध केला आहे. त्यानंतर, आमदार नवघरे यांनीही याबाबत बोलताना माझ्याविरुद्ध जाणीवपूर्वक षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप केला.

Viral vedio : what will shivsena do after the MLA's action of shivaji maharaj viral video, sadabhau khot question to shiv sena?' | Viral vedio : 'घोड्यावर बसून गाढवपणा, आमदाराच्या कृत्यानंतर काय करणार बाबरसेना?'

Viral vedio : 'घोड्यावर बसून गाढवपणा, आमदाराच्या कृत्यानंतर काय करणार बाबरसेना?'

googlenewsNext
ठळक मुद्देमहाराजांच्या घोड्यावर बसण्याचा 'गाढव'पणा करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार 'राजू नवघरे' यांच्या या कृत्यानंतर आता बाबरसेना काय करणार.

मुंबई - वसमत येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा दाखल झाला. शहरात दाखल होताना ट्रकमध्येच असलेल्या पुतळ्याचे तालुक्याचे आमदार राजू नवघरे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. मात्र या वेळेचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल (  The viral video about MLA Raju Navghare) झाला. दरम्यान, पुतळा समिती व सर्व राजकीय पक्षांनी एकी दाखवत आमदार नवघरे यांना समर्थन देत या व्हायरल पोस्टचा तीव्र निषेध केला आहे. मात्र, विरोधकांनी हा या घटनेवरुन राष्ट्रवादीचे आमदार नवघरे यांना लक्ष्य केलं आहे. 

आमदार नवघरे यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काहींना या घटनेचा तीव्र शब्दात विरोध केला आहे. त्यानंतर, आमदार नवघरे यांनीही याबाबत बोलताना माझ्याविरुद्ध जाणीवपूर्वक षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप केला. यावेळी बोलताना त्यांना रडू कोसळल्याचे दिसून आले. या घटनेनंतर आता भाजपा नेत्यांना नवघरे यांच्यावर टाकास्त्र सोडले आहे. भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून, याला सत्तेचा माज म्हणतात असे म्हटलंय. तर, रयत संघटनेचे संस्थापक माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनीही ट्विटरवर शिवसेनेला जाब विचारलाय. 


महाराजांच्या घोड्यावर बसण्याचा 'गाढव'पणा करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार 'राजू नवघरे' यांच्या या कृत्यानंतर आता बाबरसेना काय करणार. राष्ट्रवादीच्या आमदाराला चपलेने मारणार की भवनवर बोलून फुलाचा हार घालणार?, असा खोचक प्रश्न सदाभाऊ खोत यांनी ट्विटरवरुन विचारला आहे. तसेच, या घटनेचा जाहीर निषेधही नोंदवला आहे. 

आमदार राजू नवघरे नेमकं काय म्हणाले?

“महाराजांचा पुतळा उंच आहे. यावर मी चढू शकत नाही. कार्यकर्ते आणि इतर पक्षाच्या कार्यत्यांनी मला वर चढवलं. अनेक जणांनी वर चढून महाराजांना पुष्पहार चढवला. फक्त माझाच व्हिडीओ व्हायरल केला जातोय. यावेळी शिवसेनेचे माजी आमदार डॉ जयप्रकाश मुंदडा आणि इतर नेतेही वर चढले होते. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा कार्यकर्ता आहे. पुतळा शहरात उभारावा यासाठी मी भरपूर प्रयत्न केले. महाराजांचे जंगी स्वागत व्हावे म्हणून पोलिसांची परवानगी नसतांना आम्ही नोटीसा स्वीकारून महाराजांच्या स्वागतासाठी बँड लावला. पण माझ्यासारख्या सामान्य माणसाला राजकीय षडयंत्रातून बदनाम केलं जातंय”, असं आमदार नवघरे म्हणाले.
 

Web Title: Viral vedio : what will shivsena do after the MLA's action of shivaji maharaj viral video, sadabhau khot question to shiv sena?'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.