"आयसीएआयच्या परीक्षेत एमएचएच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2020 10:23 AM2020-11-19T10:23:18+5:302020-11-19T10:23:22+5:30

ICAI exam News : इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटट्स ऑफ इंडियाकडून १८ दिवसांची परीक्षा परीक्षा केंद्रावर घेण्यात येत आहे, त्यामुळे एमएचएच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करण्यात येत आहे, असा आरोप करण्यात आला आहे.

"Violation of MHA guidelines in ICAI exams" | "आयसीएआयच्या परीक्षेत एमएचएच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन"

"आयसीएआयच्या परीक्षेत एमएचएच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन"

Next

मुंबई - इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटट्स ऑफ इंडियाकडून घेण्यात येत असलेल्या परीक्षेत एमएचएच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आयसीएसआय म्हणजेच इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटट्स ऑफ इंडियाकडून १८ दिवसांची परीक्षापरीक्षा केंद्रावर घेण्यात येत आहे, त्यामुळे एमएचएच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करण्यात येत आहे.

आयसीएआयने नियमावलीतील त्रुटींचा फायदा उठवला आहे. तसेच परीक्षा केंद्रांना ब्लॉक आणि झोनमध्ये विभाजित करून किमान ४०० विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल, अशी व्यवस्था केली. ही बाब कमाल २०० विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्याच्या मार्गदर्शक तत्त्वाचे थेट उल्लंघन आहे.

परीक्षा देणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून लांबच्या अंतरावरील परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत. बहुतांश घटनांमध्ये हे क्षेत्र 10 कि.मी. ते 100 कि.मी. पर्यंत असते. सध्याच्या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणे हे अत्यंत धोकादायक आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना दररोज प्राइवेट कॅब करणे परवडणारे नाही.

तसेच काही परीक्षा केंद्रे ही कंटेन्मेंट झोनमध्ये देखील आहेत. अशा प्रकारे आयसीओआय विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळत आहे. तसेच थेट पालकांवरही परिणाम करीत आहे. हा मुद्दा केवळ सोशल मीडियावर चर्चेत आहे. मात्र त्याकडे कुणाचेही लक्ष गेलेले नाही. याबाबतचे सर्व पुरावे तुम्हाला ट्विटर आणि सोशल मीडियावर मिळतील, असा दावा आरोपकर्त्यांनी केला आहे.

Web Title: "Violation of MHA guidelines in ICAI exams"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा