Join us  

विंटेज क्लासिक गाड्यांची भुरळ : दादरमध्ये ‘क्लासिक कार फिएस्टा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 1:56 AM

जुन्या मुंबईचे आकर्षण आज जेवढे आहे, त्याहूनही कदाचित किंचित अधिक आकर्षण पूर्वीच्या काळी होते. या आकर्षणाचा केंद्रबिंदू होता, तो म्हणजे नावीन्यपूर्ण आणि देखण्या कार. अशाच जुन्या मुंंबईतील कारच्या आठवणी दादरमध्ये जागवण्यात आल्या; निमित्त होते दादर क्लासिक कार फिएस्टा प्रदर्शन २०१७चे...

मुंबई : जुन्या मुंबईचे आकर्षण आज जेवढे आहे, त्याहूनही कदाचित किंचित अधिक आकर्षण पूर्वीच्या काळी होते. या आकर्षणाचा केंद्रबिंदू होता, तो म्हणजे नावीन्यपूर्ण आणि देखण्या कार. अशाच जुन्या मुंंबईतील कारच्या आठवणी दादरमध्ये जागवण्यात आल्या; निमित्त होते दादर क्लासिक कार फिएस्टा प्रदर्शन २०१७चे...दादर सांस्कृतिक मंचातर्फे ‘दादर क्लासिक कार फिएस्टा २०१७’ प्रदर्शन रविवारी सकाळी चांगलेच रंगले. महापौर निवास व स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात हे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या वेळी एकोणिसाव्या शतकातील सर्व प्रकारच्या विंटेज आणि क्लासिक गाड्या व दुचाकी रसिकांना पाहण्यासाठी उपलब्ध होत्या. या वेळी हजारोंच्या संख्येने अबालवृद्ध आणि तरुणाई जुन्या विंटेज आणि क्लासिक गाड्या पाहण्यासाठी गर्दी केली होती. सुमारे ७० ते ८० विंटेज कार प्रदर्शनात होत्या. याप्रसंंगी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, दादर सांस्कृतिक मंचच्या अध्यक्षा उत्तरा मोने, उपाध्यक्षा योगिता प्रभू, तुषार देशमुख यांची उपस्थिती होती. जुन्या गाड्यांबद्दल अनेकांच्या मनात असलेल्या उत्सुकतेला वाट करून देण्यासाठी महापौर निवास या हेरिटेज वास्तूची निवड करण्यात आली. प्रदर्शनाला सुमारे १५ हजार विंटेज कारप्रेमींनी भेट दिल्याची माहिती आयोजक उत्तरा मोने यांनी दिली.जुन्या कार आणि आठवणी१९१९ सालची सुमारे १०० वर्षे पूर्ण होत असलेली कार या प्रदर्शनात मुख्य आकर्षण ठरली. तसेच १९३० सालची ‘फोर्ड कंपनीची मॉडेल ए’ ही गाडीदेखील उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. विशेष म्हणजे ही गाडी ८७ वर्षे जुनी असून ती मराठी माणसाची आहे. १९ व्या शतकातील अनेक कंपन्यांची मॉडेल्स या प्रदर्शनात लक्ष वेधून घेत होती. सध्या केवळ जुन्या चित्रपटांमध्ये बघायला मिळणाºया या क्लासिक विंटेज कार पाहून उपस्थितांची मनेही इतिहासात डोकावत होती. कारसोबतच दुचाकी, बस, जीपही या प्रदर्शनात लक्षणीय ठरल्या.

टॅग्स :मुंबई